उत्तर महाराष्ट्र

शहरात आज महास्वच्छता मोहीम

सकाळवृत्तसेवा

नाशिक - महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त ‘स्वच्छता हीच सेवा’ या संकल्पनेवर शहरात उद्या (ता. २२) महास्वच्छता मोहीम राबविली जाणार आहे. महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे संयुक्त मोहीम राबविली जाणार आहे.

सकाळी आठला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विशेष स्वच्छता मोहिमेचे उद्‌घाटन होईल. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे, सीमा हिरे, योगेश घोलप, विभागीय आयुक्त महेश झगडे, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल आदी उपस्थित राहतील. २ ऑक्‍टोबरपर्यंत मोहीम सुरू राहील. मोहिमेत कचरा विलगीकरणाबाबत जनजागृती होईल. २३ सप्टेंबरला 

डेंगीविषयक जनजागृती, २४ सप्टेंबरला सार्वजनिक क्षेत्रात समग्र स्वच्छता, २५ सप्टेंबरला रुग्णालये, उद्याने, पुतळे व स्मारके, बसथांबे, तलाव व स्वच्छतागृहे या भागात स्वच्छता मोहीम, २६ सप्टेंबरला शाळा, महाविद्यालये, प्राथमिक शाळा, अंगणवाडी येथे, २७ सप्टेंबरला औद्योगिक क्षेत्र, २८ ला पर्यटन, धार्मिक स्थळे व गोदावरी परिसर, २९ ला बस व रेल्वेस्थानक, उड्डाणपूल येथे स्वच्छता मोहीम राबविली जाईल. ३० सप्टेंबरला स्वाइन फ्लूबाबत जनजागृती होईल. १ ऑक्‍टोबरला शहरातील प्रसिद्ध स्थळांवर स्वच्छता मोहीम राबविली जाईल.

विभागनिहाय कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट
विभागाचे नाव                  ब्लॅक स्पॉट संख्या

सिडको                               ४३
नाशिक रोड                           ६२
पश्‍चिम विभाग                        ९५
सातपूर विभाग                       १२८
पंचवटी                                ६०
पूर्व विभाग                            ६०
------------------------------------------------
एकूण                                ४४८

महापालिका पातळीवर स्वच्छतेची तयारी
- ७६ स्वयंसेवी संस्थांचे ५५०० स्वयंसेवक
- महापालिकेचे ४५०० कर्मचारी
- स्वच्छतेसाठी ७० हजार झाडू
- एक लाख मास्क उपलब्ध करून देणार
- दोनशे घंटागाड्या सहभागी होणार
- सहा विभागांत फिरते वैद्यकीय पथक

सुंदर नाशिक व स्वच्छ नाशिक संकल्पनेला हातभार लावण्यासाठी नाशिककरांनी सहभागी व्हावे. महात्मा गांधी जयंतीपर्यंत मोहीम राबविली जाणार असून, स्वच्छता अभियानात योगदान द्यावे.
- रंजना भानसी, महापौर

महास्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महापालिकेचे कर्मचारी प्रत्येकापर्यंत पोचण्याचा प्रयत्न करणार आहेत. डेंगी, स्वाइन फ्लूबाबत जनजागृती होणार आहे.
- अभिषेक कृष्णा, आयुक्त, महापालिका

विरोधकांच्या सहभागाची शक्‍यता कमी
महापालिकेतील शिवसेनेसह सर्व विरोधी पक्षांनी स्वच्छतेच्या मुद्द्यावर लक्षवेधी मांडल्यानंतर त्यावर कारवाई करण्यापेक्षा प्रशासनाची बाजू घेण्यात सत्ताधारी भाजपने धन्यता मानली. आता स्वच्छतेच्या माध्यमातून ‘शो’बाजी करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप महासभेत करण्यात आला. त्यामुळे महास्वच्छता अभियानात विरोधकांचा सहभाग राहणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले असल्याने अभियान भाजपपुरतेच मर्यादित राहील. 

सेलिब्रिटींचा सहभाग
सायकलपटू डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, चित्रकार राजेश सावंत, प्रफुल्ल सावंत, शिशिर शिंदे, अभिनेता चिन्मय उद्‌गीरकर, छायाचित्रकार प्रसाद पवार, तलवारबाजीपटू अशोक दुधारे सहभागी होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: "PM मोदींची उमेदवारी रद्द करा"; निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास हायकोर्टाचा नकार

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूड इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT