उत्तर महाराष्ट्र

एकशे पंचवीस घरांमध्ये  डेंगी डासांच्या १६६ अळ्या

सकाळवृत्तसेवा

नाशिक - महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता पंधरवडा अंतर्गत आज शहरातील विविध भागांत मलेरिया विभागाने तपासणी केली. यात १२५ घरांमध्ये १६६ डेंगी डासांच्या अळ्या आढळून आल्या. एकाच दिवसात पंचवीस ठिकाणी अळ्या आढळल्याने शहरात रोगराई असल्याच्या विरोधकांच्या आरोपांना पुष्टी मिळाली. 

महापालिकेतर्फे २२ सप्टेंबर ते २ ऑक्‍टोबर या कालावधीत स्वच्छता अभियान राबविले जात आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते या अभियानाचे उद्‌घाटन झाले. आज दुसऱ्या दिवशी मलेरिया विभागाने शहरातील ३१ प्रभागांमधील घरांमध्ये तपासणी केली. यात नऊ हजार ५६८ घरांना भेटी देण्यात आल्या. ११ हजार ३९५ पाणीसाठ्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल १२५ घरांमधील १६६ पाणी साठ्यांमध्ये डेंगी डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळून आले. ५७ साठ्यांमध्ये औषधफवारणी करण्यात आली. ११८ उत्पत्ती साठे नष्ट करण्यात आले. डेंगी जनजागृतीसाठी ११९ ठिकाणी गटसभा घेण्यात आल्या. सात हजार ८०० पत्रके वाटण्यात आली. एक हजार ७३७ स्टिकर्स वाटले, ध्वनिक्षेपकावरून १५ प्रभागांत जनजागृती करण्यात आली. १३९ ठिकाणी गप्पी मासे सोडण्यात आले. २२४ टायर जप्त करण्यात आल्याची माहिती आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रासाठी आर्थिक विकासाची ‘गॅरंटी’, नवी दिल्ली भेटीत पंतप्रधानांचे आश्वासन

Labour Day : गरजूंना हमखास रोजगार मिळवून देणारी ही सरकारी योजना तुम्हाला माहीत आहे का ?

ढिंग टांग : भटकती आत्मा आणि बाबा बंगाली..!

Maharashtra Day 2024: मराठी गिरा दिसो...!

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

SCROLL FOR NEXT