उत्तर महाराष्ट्र

खुनाच्या गुन्ह्यातील संशयित शेट्टी अवतरला महासभेत

सकाळवृत्तसेवा

नाशिक - खुनाच्या आरोपाखाली सहा महिन्यांपासून कारागृहामध्ये असलेल्या भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याला न्यायालयाने महासभेत हजर राहण्याची परवानगी दिल्यानुसार शेट्टी पोलिस बंदोबस्तात व कार्यकर्त्यांबरोबर आज महासभेत हजर राहिल्याने नगरसेवकपदावरचे गडांतर टळले आहे. यानिमित्ताने भाजप नगरसेवकांची शेट्टीचे पद वाचविण्याची धडपडही फलदायी ठरली. 

प्रभाग चारमधील भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी खुनाच्या आरोपाखाली अटक आहे. सलग सहा महिने गैरहजर राहिल्यास कलम ११ नुसार नगरसेवकपद रद्द होत असल्याने पद वाचविण्यासाठी महासभा गुंडाळण्याची धडपड भाजप नगरसेवकांना करावी लागली. ३० नोव्हेंबरपर्यंत शेट्टी महासभेला हजर राहिला नसता, तर त्याचे पद रद्द झाले असते. त्यामुळे २० नोव्हेंबरला बोलावलेली महासभा स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्‍त्या जाहीर करून महापौर भानसी यांनी गुंडाळली. त्यामागे शेट्टीचे नगरसेवकपद रद्द होऊ न देण्याची धडपड असल्याचे स्पष्ट झाले. 

नगरसेवक शेट्टी याने जामीन अर्ज सादर करताना महासभेला हजर राहण्याची परवानगी मागितली होती. परंतु न्यायालयाने महापौरांना पत्र पाठवून महासभेबाबत विचारणा केल्यानंतर २१ नोव्हेंबरच्या महासभेला हजर राहण्याची परवानगी देण्यात आली. २० नोव्हेंबरच्या महासभेचे वेळापत्रक सात दिवसांपूर्वीच ठरल्याने काही विषय मंजूर करत सभेचे कामकाज आटोपत महापौर भानसी यांनी २१ नोव्हेंबर म्हणजे आज सभा घेतली.

शेट्टीचे आगमन, नगरसेवकांची धावपळ 
महासभा दुपारी दोनला असली तरी न्यायालयाने पोलिस बंदोबस्तासह दुपारी एक ते तीन या वेळेत शेट्टीला हजर राहण्याची परवानगी दिली होती. त्यानुसार दुपारी दोनला शेट्टी बंदोबस्तात प्रथम महापौरांच्या रामायण निवासस्थानी पोचला. त्यानंतर महासभेत दाखल झाला. सभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर भाजप नगरसेवक जगदीश पाटील यांनी शेट्टीला मत मांडण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती महापौर भानसी यांच्याकडे केली. त्यानंतर शेट्टी प्रभागातील विकासकामांना मंजुरी देण्याची मागणी करत सभागृहातून निघून गेला. त्यापूर्वी शेट्टीला कार्यकर्त्यांचा बंदोबस्त पुरविण्यात

आजच्या महासभेत
 संभाजी मोरुस्कर व दिनकर पाटील यांना चंगू-मंगू संबोधल्याने गजानन शेलार यांच्याशी शाब्दिक खडाजंगी
 अंगणवाडी पोषण आहारातून पिकविलेली केळी होणार हद्दपार
 महापालिकेची भंगारात काढलेल्या वाहनांचे आरटीओकडून होणार मूल्यमापन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT