उत्तर महाराष्ट्र

मध्य रेल्वेचा आज पाच तासांचा मेगा ब्लॉक 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - मध्य रेल्वेच्या मार्गावर गुरुवारी (ता. 18) पाच तासांचा मेगा ब्लॉक होणार असल्याने मध्य रेल्वेने उद्या दोन्ही बाजूंच्या मुंबईतील 54 रेल्वे फेऱ्या रद्द केल्या आहेत. त्यात नाशिक मार्गावरील अनेक गाड्यांचा समावेश असून, काही गाड्यांचे मार्गही बदलले आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. 

मध्य रेल्वेच्या कल्याण ते कसारादरम्यानच्या आंबिवली स्थानकावर पाचदारी पुलाचे काम करण्यासाठी उद्या सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत मेगा ब्लॉक होणार आहे.  उद्या होणाऱ्या या वेळेतील अप व डाउन मार्गावरील प्रत्येकी 27 फेऱ्या याप्रमाणे 54 रेल्वेच्या फेऱ्या रेल्वे प्रशासनाने रद्द केल्या आहेत. त्यात नाशिकहून धावणाऱ्या काही गाड्यांचा समावेश आहे. 

महत्त्वाच्या गाड्या रद्द 
मेगा ब्लॉकमुळे अप मार्गावरील (12187) जबलपूर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स, (12117) लोकमान्य टिळक- मनमाड राज्यराणी, (12118) मनमाड लोकमान्य टिळक तसेच (12188) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते जबलपूर एक्‍स्प्रेस या गाड्या रद्द केल्या आहेत. 

मार्गात बदल 
मेगा ब्लॉकमुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. काही गुजरातमार्गे वळविल्या जाणार आहेत. त्यात, 12321 (हावडा छत्रपती शिवाजी टर्मिनल्स) (22110) 
निजामुद्दिन एक्‍स्प्रेस जळगाव, सुरत, वसई रोड, दादरमार्गे वळविली आहे. कल्याण- इगतपुरी मार्गाऐवजी अनेक गाड्या मनमाड, दौंड मार्गाने वळविल्या जाणार आहेत. त्यात 13201 राजेंद्रनगर लोकमान्य टिळक टर्मिनल्स, (12168) लोकमान्य टिळक वाराणसी सुपरफास्ट एक्‍स्प्रेस (जळगाव- सुरत मार्गे) याशिवाय लोकमान्य 
टिळक टर्मिनन्सहून सुटणाऱ्या (11059) छपरा एक्‍स्प्रेस, (12542) गोरखपूर तर (15548) जयनगर एक्‍स्प्रेस या रेल्वेगाड्या वसई रोड, सुरत, जळगावमार्गे सोडल्या जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT