उत्तर महाराष्ट्र

हॉर्न वाजविल्यावरून श्रमिकनगरमध्ये गोळीबार 

सकाळवृत्तसेवा

सातपूर - सातपूरमधील श्रमिकनगर परिसरातील सातमाउली चौकात भरदुपारी गोळीबाराची घटना घडली. या घटनेत जखमी तरुणाने नेम चुकविला नसता तर त्याच्या जिवावर बेतले असते. जखमी रामबाबू वाल्मीकी यांच्या फिर्यादीवरून कलम 307 प्रमाणे संशयित नंदन जयस्वाल या परप्रांतीय तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी त्वरित गुन्हेगाराच्या मुसक्‍या आवळाव्यात, अशी मागणी नगरसेवक व सभागृहनेते दिनकर पाटील यांनी केली. 

सातमाउली चौकात नंदन काही साथीदारांसोबच मोटारसायकल (एमएच 15, ईएम 4585)वर चकरा मारत असताना मोठ्याने हॉर्न वाजवत होता. त्यामुळे रात्रपाळी करणारे कामगार या आवाजाने जागे झाले. त्यातील रामबाबू वाल्मीकी यांनी नंदनला, का हॉर्न वाजवतो, असे विचारले. नंदने घरातून गावठी पिस्तूल आणून रामबाबूवर गोळीबार केला. पण सावध रामबाबू व त्यांच्या भावाने नेम चुकवत आरडाओरडा करत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यात नंदन पळत असताना त्याने हातातील पिस्तूल एका घराजवळ फेकले. सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश आखाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप वराडे, गुन्हे शाखा निरीक्षक शांताराम चव्हाण, योगेश देवरे, पोलिस उपनिरीक्षक राऊत आदी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची नाकाबंदी करीत महिला कर्मचाऱ्यांच्या मदतीने घरातून महिलांना विश्‍वासात घेतले. त्यात नंदन व त्याच्या काही साथीदारांची नावे समोर आली. आखाडे यांनी नंदनच्या घराची झडती घेतली असता तो फरारी झाला होता. नागरिकांनी एकच गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरणही निर्माण झाले. नगरसेवक दिनकर पाटील, अमोल पाटील, दिनकर कांडेकर, हेमंत शिरसाठ यांनी गर्दी कमी केली. पोलिसांनी नंदनचे आई-वडील व त्याच्या काही साथीदारांना ताब्यात घेतले. 

गुन्हेगारीने नागरिक त्रस्त 
दोन दिवसांपूर्वीच या भागातून गुन्हे शाखेने गावठी कट्टा हस्तगत केला होता, तर आठ दिवसांपूर्वी पायी जाणाऱ्या तरुणाला लुटले होते. आज भरदुपारी गावठी कट्ट्याने गोळीबार झाल्याने पोलिसांचा धाक आहे की नाही, असा सवाल नागरिक करीत आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न बिघडण्यापूर्वीच पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुळापर्यंत जावे, अशी मागणी नागरिकांनी केली. 

भंगार बाजार हटविल्यानंतर परप्रांतीय नागरिकांनी हत्यारे नातेवाइकांकडे ठेवल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच सातपूर व अंबड भागात गावठी कट्टे आढळत आहेत. पोलिसांनी सखोल तपास करण्याची गरज आहे. 
-दिनकर पाटील, सभागृहनेते 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT