उत्तर महाराष्ट्र

नोटाबंदीच्या निषेधार्थ शिवसेनेसह विरोधकांतर्फे आज वर्षश्राद्ध, धरणे

सकाळवृत्तसेवा

नाशिक - गेल्या वर्षी केंद्र सरकारने ८ नोव्हेंबरला पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटाबंदीच्या घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजपचा मित्रपक्ष शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह इतरांनी वर्षश्राद्ध, धरणे, मोर्चा व उपोषण, असे विविध आंदोलनात्मक कार्यक्रम घेत काळा दिन पाळण्याचे नियोजन केले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षातर्फे या नोटाबंदी निर्णयाचे स्वागत करतानाच हा दिन भ्रष्टाचारमुक्ती दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. 

गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेतला होता. त्यात पाचशे व एक हजार रुपयांच्या चलनी नोटा रातोरात अवैध ठरविण्यात आल्या. भ्रष्टाचार व काळ्या पैशाला आळा बसेल, नोटाचोरी (स्मगलिंग) थांबेल, दहशतवादी कारवाया नियंत्रणात येतील, असा दावा त्या वेळी करण्यात आला. पण पंतप्रधान मोदी यांचे सर्व दावे फोल ठरलेच. याउलट सर्वसामान्य, व्यापारी, व्यावसायिकांचे नुकसान झाले. देशभरात मंदीची मोठी लाट उसळली. नोटाबंदीने नागरिकांना ‘अच्छे दिन’ऐवजी बुरे दिन पाहायला मिळाले. त्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे रामकुंडावर सकाळी दहाला वर्षश्राद्ध घालण्यात येईल. पंतप्रधानांनी नोटाबंदीच्या नावाखाली नागरिकांना फसवल्याचे शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे तहसीलवर आंदोलन
नोटाबंदीचा धाडसी निर्णय घेणाऱ्या भाजप- शिवसेना युतीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तहसील कार्यालयांसमोर वर्षश्राद्ध घालून 

प्रतीकात्मक आंदोलन केले जाईल, अशी माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी दिली. या निर्णयानंतर नागरिकांवर प्रचंड आर्थिक ताण निर्माण होऊन हालअपेष्टांना सामोरे जावे लागले होते. त्याविरोधात नाशिक रोड येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर सकाळी अकराला आंदोलन होईल.

महाराष्ट्र जनस्वराज्य संघटनेतर्फे वर्षश्राद्ध
उद्या सकाळी नऊला महाराष्ट्र जनस्वराज्य संघटनेतर्फे गंगाघाट येथे वर्षश्राद्ध होईल. समाधान भारतीय, योगेश कापसे, नाना बच्छाव, आनंद ढोली व त्यांचे सहकारी यात सहभाग होणार आहेत. 

पुरोगामी संघटनांतर्फे मोर्चा 
पुरोगामी संघटनांनी उद्या दुपारी चारला भालेकर हायस्कूल मैदानावरून मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात कामगार संघटना, शेतकरी संघटना, पुरोगामी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या निषेध मोर्चाची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर होईल. 

रिपब्लिकनचा आज ‘व्हाइट मनी डे’ 
नोटाबंदीच्या निर्णयाच्या वर्षपूर्तीनिमित्त रिपब्लिकन पक्षातर्फे उद्या (ता. ८) शालिमार चौकात ‘व्हाइट मनी डे’ म्हणून साजरा केला जाईल, असे रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. महानगरप्रमुख पवन क्षीरसागर, नारारण गायकवाड, अमोल पगारे, कलिम सय्यद, सागर गायकवाड, सुनील साखरे, अजय सिंग, प्रदीप कटारे, योगेश लोंढे उपस्थित होते. लोंढे म्हणाले, की या निर्णयाला आमचा पूर्ण पाठिंबा असून, शालिमार चौक येथील डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ ‘व्हाइट मनी डे’ म्हणून साजरा केला जाईल. 

दिवे बंद ठेवून निषेध
आवामी विकास पक्षाने उद्या रात्री ८ ते ९ दरम्यान दिवे बंद ठेवून नोटाबंदीचा निषेध करण्याचे ठरविले आहे. नागरिकांनीही दिवे बंद ठेवून या उपक्रमात सहभागी होऊन निषेध नोंदवावा, असे त्यांनी म्हटले आहे. भारिप-बहुजन महासंघाने हा दिवस लुटारू दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे.

काँग्रेस पाळणार ‘काळा दिन’
काँग्रेसने हा दिवस ‘काळा दिन’ घोषित केला आहे. नोटाबंदीच्या या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, असा पवित्रा घेत काँग्रसतर्फे उद्या दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन पुकारले आहे. याबाबत आगामी काळात लोकांमध्ये जाऊन जनतेत जनजागृती केली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवार, अमित शाहांनी बजावला मतदानाचा हक्क

Share Market Today: शेअर बाजारात आजही घसरण होणार का? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

Sabudana Paratha Recipe : नाश्त्याला झटपट बनवा चविष्ट साबुदाणा पराठा, पोषणासोबतच मिळेल भरपूर ऊर्जा, वाचा सोपी रेसिपी

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

SCROLL FOR NEXT