उत्तर महाराष्ट्र

नाशिक -  बालाजी मंदिराजवळ अपघातात दोघे ठार 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - गंगापूर रोडवरील बालाजी मंदिराजवळ बुधवारी (ता.26) दुचाकींचा समोरासमोर झालेल्या अपघातांमध्ये दोघे ठार तर एक जण गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली. विजय सुदाम गांगुर्डे (40, रा. शिंदे गल्ली, गंगापूरगाव), बाळासाहेब किसन शिंदे (28, रा. गंगापूरगाव) अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत. तर गुलाब नथू शिरसाठ (रा. गंगापूरगाव) हे गंभीररित्या जखमी असून याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरचा अपघात बुधवारी (ता.26) रात्री साडेनऊ-दहा वाजेच्या सुमारास गंगापूर रोडवरील बालाजी मंदिराजवळील कवडे गार्डनसमोर घडला. विजय गांगुडे व त्यांचा मित्र युवराज शिरसाठ हे दोघे दुचाकीवरून (एमएच 15 डीक्‍यु 7142) गंगापूर गावाकडून बारदान फाट्याकडे जात होते. त्याचवेळी गुलाब नथू शिरसाठ व बाळासाहेब किसन शिंदे हे दोघे दुचाकीवरून (एमएच 15 डीएन 3566) जात होते. त्यांनी गंगापूर रोडवर असलेल्या बालाजी मंदिराकडे वळण घेण्यासाठी कवडे गार्डनजवळून अचानक वळण घेतले. त्यावेळी दोन्ही दुचाकींची समोरासमोर धडक झाली. 

या अपघातामध्ये विजय गांगुर्डे आणि गुलाब शिरसाठच्या पाठीमागे बसलेले बाळासाहेब शिंदे यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागल्याने त्यांच्या नाका-तोंडातून रक्त आले आणि ते जागीच ठार झाले. तर गुलाब शिरसाठ यांनाही गंभीर मार लागला आहे. अपघातामध्ये दोन्ही दुचाक्‍यांचा चक्काचूर झाला आहे. तिघांना तातडीने जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी विजय गांगुर्डे, बाळासाहेब शिंदे यांना मृत घोषित केले. याप्रकरणी संशयित दुचाकीस्वार गुलाब शिरसाठ यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा गंगापूर पोलिसात दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT