Death
Death esakal
नाशिक

Nashik News: शहरातील 2 पोलीसांच्या आत्महत्या; लागोपाठच्या घटनांमुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक शहरातून एक मोठी खळबळजनक घटाना समोर आली आहे. शहरातील दोन पोलीसांनी आत्महत्या केलीये. लागोपाठ आत्महत्येच्या या घटना घडल्या आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीये. (2 policemen commit suicide in city fear among police families due to consecutive incidents Nashik News)

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात दोन दिवसात दोन पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यात आणखीन धक्कादायक बाब म्हणजे नाशिक पोलीस मुख्यालयात ऑन ड्युटी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. मोहन बोरसे (वय 40) आणि शिवराम निकम (वय 57)अशी आत्महत्या केलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

मोहन बोरसे हे पोलिस मुख्यालयात चालक पदावर कार्यरत होते. तर शिवराम निकम सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत होते. बोरसे यांनी ऑन ड्युटी असताना आपलं जीवन संपवलं आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तसेच निकमांनी आपल्या राहत्या घारी गळफास घेत आत्महत्या केलीये. या घटनांमुळे पोलीस कुटुंबीयांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. पोलिसांनी त्यांचे शव ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेत.

शहरातील पोलीस ठाण्यात काम करणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा एकाचवेळी मृत्यू झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे. त्यांनी ही आत्महत्या नेमकी का केली. या दोघांच्या आत्महत्येचा काही संबंध आहे का? त्यांच्यावर कोणत्या गोष्टींचा दबाव होता का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT