crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : कॅफे चालकांना 2 हजार रुपये दंड

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : शहरातील कॅम्प पोलिस ठाणे कार्यक्षेत्रातील तीन कॅफे चालकांना येथील न्यायालयाने प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

नाशिक येथील एमडी ड्रग्ज प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिस प्रशासन सतर्क झाले. (2 thousand rupees fine to cafe operators nashik crime news )

नाशिकचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या आदेशाने शहरातील कॅफे चालकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत तिघा कॅफेंमध्ये काही तरुण, तरुणी असभ्य वर्तन करताना मिळून आले होते.

श्री. उमाप यांच्या आदेशानंतर अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, कॅम्प पोलिस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र भोसले आदींनी सहकारी व महापालिका अधिकाऱ्यांसह येथील कॅम्प भागातील सर्व कॅफे चालकांची तपासणी केली.

कॅफे चालकांनी संबंधित तरुण-तरुणींना असभ्य वर्तन करण्यासाठी खासगी जागा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्यावर कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाने कॅफे चालकांना प्रत्येकी दोन हजार दंड सुनावल्याचे कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT