Fire at Main Road (File Photo) 
नाशिक

Fire Accident: दिवाळीत शहरात 20 आगीच्या घटना; आगीपासून बचाव करण्यासाठी कार्यरत, कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ड्यूटी

सकाळ वृत्तसेवा

Fire Accident : दिवाळीत शहरात २० आगीच्या घटना घडल्या. त्यात फटाक्यांमुळे लागलेल्या आगीच्या १४ घटनांचा समावेश आहे. अन्य चार ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागली होती. सर्वाधिक मुख्यालय परिक्षेत्रातील आठ, तर त्यापाठोपाठ पंचवटी भागात सात आगीच्या घटना घडल्या.

दिवाळीच्या पाच दिवसांत अग्निशमन विभागास सुमारे २५ कॉल झाले. रविवारी (ता. १२) सर्वाधिक आठ कॉल झाल्याने अग्निशमन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ उडाली होती.

दिवाळीत फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडत असतात. यंदाही दिवाळीच्या पाच दिवसांत तब्बल १४ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागण्याची घटना घडली आहे. काही ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. (20 fire incidents in city during Diwali nashik news)

सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. रविवार (ता. १२) सर्वाधिक फटाक्याने आग लागण्याच्या सात घटना घडल्या. शनिवारी तीन, तर सोमवारी चार अशा १४ घटना शहरात घडल्या. दरम्यान, शॉटसर्किटमुळे चार, तर अन्य दोन आग लागण्याच्या घटना आहेत.

एकीकडे सर्वजण दिवाळीचा आनंद साजरा करत फटाक्यांची आतषबाजी करत होते, तर दुसरीकडे अग्निशमन विभाग फटाक्यांपासून लागलेल्या आगीपासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी तब्बल ३६ तास कार्यरत होते.

त्यांची सारखी धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. कर्मचारीसंख्या अपुरी असल्याने उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ड्यूटी करावी लागण्याची वेळ आली. तरीदेखील त्यांनी आपले कर्तव्य सुरू ठेवले. मेन रोड येथील कपड्याच्या दुकानास लागलेल्या आगीने कर्मचाऱ्यांची सर्वाधिक धावपळ उडाली होती.

याठिकाणी घडल्या घटना

- पंचवटी, हमालवाडी गवतास आग

- सिडको, चेतनानगर फ्लॅटला आग

- द्वारका परिसरात कचऱ्यास आग

- अशोका मार्ग, फ्लॅट गॅलरीत आग

- मेन रोड, धुमाळ पॉइंट दुकानास आग

- उपनगर, शांतीपार्क इलेक्ट्रिक वस्तूंना आग

- दिंडोरी रोड, पंचवटी मॉलला आग

- रवींद्र हायस्कूल शेडवरील कचऱ्यास आग

- मदिना चौक येथे कचऱ्यास आग

- रविवार कारंजा दुकानासमोरील मंडपास आग

- आठवले चेंबर्स येथील कचऱ्यास आग

- जिल्हा परिषद येथील वृक्षास आग

- पिनॅकल मॉल आग

- सिडको गॅरेजला आग

- पंचवटी डीपीजवळ आग

- पांडव लेणी कचऱ्यास आग

- बळी मंदिर येथे गवतास आग

- पंचवटी, एसटी वर्कशॉप गवतास आग

- पंचवटी पुष्ठा दुकानास आग

- सिडको, सद्‍गुरूनगर येथे झाडास आग

- टागोरनगर गॅलरीत आग

- तपोवन रोड येथे गवताच्या गंजीस आग

- इंद्रकुंड भागात डीपीसलागून आग

- खुटवडनगर येथे घरास आग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satara News: यशवंत बँक गैरव्यवहारप्रकरणी शेखर चरेगावकरला अटक; दोन मार्चपर्यंत पोलिस कोठडी, सातारा जिल्ह्यात उडाली खळबळ!

मोठी बातमी! शिक्षकांसाठी आता निवड अन्‌ वरिष्ठ वेतनश्रेणीसाठीही ‘टीईटी’ बंधनकारक? या वर्षात शिक्षकांना ४ ‘टीईटी’ देण्याची संधी, वाचा...

Holi 2026: बाजारातील चिप्स विसरा! होळीला पाहुण्यांसाठी घरीच बनवा टेस्टी बटाटा चिप्स

विद्यार्थ्यांनो, अभ्यासाला लागा! विद्यापीठाची २ एप्रिलपासून अंतिम सत्र परीक्षा; अभियांत्रिकीची परीक्षा ३० एप्रिलपासून; प्रत्येक केंद्रावर ‘सीसीटीव्ही’

Panchang 26 February 2026: दत्तात्रेय वज्रकवच स्तोत्राचे पठण व ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT