Admission
Admission esakal
नाशिक

नाशिक महापालिका क्षेत्रात अकरावीच्‍या साडेबावीस हजार जागा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : येथील नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये केंद्रीभूत ऑनलाइन पद्धतीने प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. याअंतर्गत दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संकेतस्‍थळावर नोंदणी करता येणार आहे. कला, वाणिज्‍य व विज्ञान शाखेच्‍या सुमारे साडेबावीस हजार जागा प्रवेशासाठी उपलब्‍ध आहेत.

२०२२-२३ या शैक्षणिक वर्षाच्या इयत्ता अकरावीची‍ प्रवेशप्रक्रिया गेल्‍या ३० मेपासून सुरू झाली आहे. या अंतर्गत दहावीच्‍या परीक्षेला प्रविष्ट झालेल्‍या विद्यार्थ्यांना संकेतस्‍थळावर ऑनलाइन नोंदणी करायची होती. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच या प्रक्रियेला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळाला होता. या अंतर्गत संकेतस्‍थळावर अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया सुरू होती. विद्यार्थ्यांना https://nashik.11thadmission.org.in या संकेतस्‍थळावरून नोंदणी करता येणार आहे.

अर्जाच्‍या भाग दोनची प्रतीक्षा कायम

दरम्‍यान, महाविद्यालय व शाखेचा पसंतीक्रम नोंदविण्यासाठी अर्जाचा भाग दोन भरायचा आहे. सध्या भाग एक भरण्याच्‍या प्रक्रियेला प्रतिसाद मिळत आहे. असे असले, तरी अर्जाचा भाग दोन भरण्यासंदर्भात सूचनेच्‍या प्रतीक्षेत विद्यार्थ्यांसह पालकही आहेत.

साडेचौदा हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

आतापर्यंत या प्रक्रियेत १४ हजार ५७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यापैकी दहा हजार २०२ विद्यार्थ्यांनी पर्याय लॉक केले आहेत. सध्या राज्‍य शिक्षण मंडळाच्‍या विद्यार्थ्यांना नोंदणी करता येत असून, अन्‍य बोर्डातील विद्यार्थ्यांना त्‍यांचा निकाल जाहीर झाल्‍यानंतर नोंदणी करता येणार आहे.

अकरावीची शाखानिहाय प्रवेश क्षमता

(१७ जूनपर्यंत)

शाखा महाविद्यालये प्रवेश क्षमता

विज्ञान ६४ नऊ हजार ४००

वाणिज्‍य ६१ सात हजार ६५०

कला २८ चार हजार ३९०

एचएसव्‍हीसी आठ एक हजार

एकूण १६१ २२ हजार ४४०

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: कोणतेही काम करण्यापूर्वी मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थानी जातो: PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT