Ongoing inspection of private buses in a special drive by Regional Transport Office.  esakal
नाशिक

RTO Bus Inspection : रस्‍त्‍यावर धावणाऱ्या 31 टक्‍के खासगी बस सदोष; आरटीओच्‍या तपासणीत धक्‍कादायक माहिती समोर

सकाळ वृत्तसेवा

RTO Bus Inspection : खासगी बसच्या वाढत्‍या अपघातांच्‍या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने खासगी प्रवासी बस विशेष तपासणी केली जाते आहे. या मोहिमेत अनेक धक्‍कादायक बाबी समोर आलेल्‍या आहेत.

आठवडाभरात तपासलेल्‍या ४६२ बसपैकी १४३ बस सदोष आढळल्‍या असून, हे प्रमाण तब्‍बल ३१ टक्‍के आहे. यामुळे प्रवाशांच्‍या जिवाशी सुरू असलेला खेळ उघड झालेला आहे. (31 percent of private buses running on road are defective inspection by rto nashik news)

प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे पंधरा दिवसांची विशेष मोहीम राबविली जाते आहे. १ जुलैपासून सुरू केलेल्‍या या मोहिमेत आठवड्याभरानंतर धक्‍कादायक माहिती समोर येते आहे. खासगी प्रवासी बसच्या विशेष तपासणी मोहिमेत शुक्रवार (ता. ७) पर्यंत एकूण ४६२ बसची तपासणी केली आहे.

यामध्ये एकूण १४३ वाहने दोषी आढळून आले आहेत. यांच्यावरील दंडात्मक कारवाईमध्ये आतापर्यंत २ लाख ५२ हजार ५०० रुपये इतका दंड आणि चार लाख ६५ हजार रुपये कर स्वरूपात वसुल करण्यात आला आहे. तसेच त्यापैकी ६ वाहने प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे जप्त करण्यात आल्‍या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

आढळलेले दोष असे..

मोहिमेमध्ये बसमध्ये विविध दोष आढळले आहेत. यामध्ये प्रामुख्याने वेग नियंत्रकामध्ये छेडछाड, अग्‍निशमन यंत्रणा नसणे, विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणारी वाहने, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी, अवैधरीत्या टप्पा वाहतूक, अवैध मालवाहतूक करणाऱ्या बस, वाहनांमध्ये बेकायदेशीर केलेले फेरबदल, आपत्कालीन निर्गमन आणि दरवाजे कार्यरत स्थितीत नसणाऱ्या, योग्यता प्रमाणपत्र नसणाऱ्या, जादा भाडे आकारणाऱ्या व रिफ्लेक्टर, इंडिकेटर, टेल लाइट, वायपर आदी तसेच मोटार वाहन कायद्यातील गुन्ह्यानुसार तपासणी करताना कारवाई केली आहे.

नियमित तपासणी का नाही?

आरटीओ कार्यालयामार्फत नियुक्‍त पथकांकडून नियमित तपासणी करणे अपेक्षित आहे. असे असताना नियमित तपासणी न होण्यामागे काय ‘अर्थ’ आहे, असा प्रश्‍न उपस्‍थित केला जातो आहे. आणि जर या पथकांकडून नियमित तपासणी होत असेल, तर रस्‍त्‍यावर सदोष वाहने धावतातच कशी, असा प्रश्‍नदेखील उपस्‍थित केला जातो आहे. प्रवाशांच्‍या जिवाशी खेळ थांबवत विभागाकडून कठोरतेने कारवाईची मागणी होते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam 104.28 TMC Water Storage : कोयना धरण 100 टक्के भरण्याच्या मार्गावर! फक्त 0.97 TMC पाण्याची गरज; पायथा वीजगृहातून 1 हजार 50 क्युसेक विसर्ग सुरू

Kolhapur ZP Teacher Recruitment: जिल्हा परिषदेच्या शाळांत ४४५ नवीन शिक्षक रुजू होणार

Maratha Reservation Protest: गोंधळ घालून सरकारला केले आवाहन मराठा आरक्षणासाठी दसरा चौकात सकल मराठा समाजाचा अनोखा जागर

Shivaji University GeM Purchase: प्रशासकीय जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल जीईएम खरेदी व्यवहारांची तपासणी सुरू; अंतर्गत लेखापरीक्षक करणार मार्गदर्शक सूचना

IPL 2027 Rule: फ्रँचायझींकडून हरकती अन् आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये बदल; वादग्रस्त नियम हटवणार? BCCI च्या Emailमध्ये नेमकं काय?

SCROLL FOR NEXT