11th Admission Deadline : अकरावी तिसऱ्या फेरीच्‍या नोंदणीची उद्यापर्यंत मुदत

11th admissions process
11th admissions processesakal

11th Admission Deadline : इयत्ता अकरावीच्‍या केंद्रीभूत ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील तिसऱ्या फेरीत सहभागासाठी रविवार (ता. ९) पर्यंत मुदत असणार आहे.

या फेरीसाठीची निवड यादी बुधवारी (ता. १२) प्रसिद्ध केली जाणार आहे. नियमित फेऱ्यांसह कोट्याच्‍या जागांच्‍या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. (11th admission Deadline for registration third round till 9 july nashik news)

नाशिक महापालिका क्षेत्रातील ६६ कनिष्ठ महाविद्यालयात अकरावीच्‍या प्रवेशासाठी ही प्रक्रिया सुरू आहे. आत्तापर्यंत दोन नियमित फेऱ्या पार पडल्‍या असून, प्रवेश फेरीत ९ हजार ८१३ विद्यार्थ्यांनी तर कोट्याच्‍या जागांवर १ हजार १३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. उर्वरित रिक्‍त जागांसाठी तिसरी नियमित फेरी राबविली जात आहे.

या फेरीकरीता नोंदणी प्रक्रियेला गुरुवारपासून सुरवात झाली असून, रविवारी रात्री दहापर्यंत नोंदणीची मुदत असणार आहे. या मुदतीत यापूर्वी नोंदणी न केलेल्‍या विद्यार्थ्यांना नोंदणी करता येईल. नोंदणीकृत विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग १ मध्ये दुरुस्‍ती करता येणार आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

11th admissions process
ITI Admission Deadline : आयटीआयमध्ये प्रवेशासाठी इच्छूकांना 11 जुलैपर्यंत मुदत; या संकेतस्थळावर करा अर्ज

अर्जाचा भाग १ पडताळणी झालेल्‍या विद्यार्थ्यांना महाविद्यालय व शाखा निवडीसाठीचा पसंतीक्रम नोंदविता येणार आहे. हा पसंतीक्रम नोंदविल्‍यानंतर विद्यार्थ्यांनी भाग २ लॉक करणे आवश्‍यक असणार आहे.

आकडे बोलतात..

प्रवेश फेरीसाठी उपलब्‍ध जागा-------२२ हजार ८६२

आत्तापर्यंत झालेले प्रवेश--------------९ हजार ८१३

रिक्‍त जागा---------------------------१३ हजार ०४९

कोट्यांतर्गत उपलब्‍ध जागा---------४ हजार ०१८

कोट्याच्‍या जागांवर प्रवेश----------१ हजार ०१३

कोट्याच्‍या रिक्‍त जागा-------------३ हजार ००५

11th admissions process
11th Admission : आता उत्पन्नाचा दाखला नसला, तरी अकरावीत मिळणार प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com