40 percent petrol pumps in city closed due to strike nashik truck driver strike news
40 percent petrol pumps in city closed due to strike nashik truck driver strike news esakal
नाशिक

Nashik Truck Drivers Strike : शहरातील 40 टक्के पेट्रोलपंप बंद; संपाचा परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Nashik Truck Drivers Strike : इंधन वाहतूकदारांनी पुकारलेला देशव्यापी संप मंगळवारी मिटल्यानंतर बुधवारी (ता. ३) शहरातील सुमारे ४० टक्के पेट्रोलपंप बंद राहिले. एकावेळी सर्वत्र वाहतूक सुरू झाल्याने टँकरचा तुटवडा जाणवल्याने काही पेट्रोलपंपांना इंधन उपलब्ध होऊ शकले नाही.

गुरुवारी (ता. ४) जिल्ह्यातील शंभर टक्के पेट्रोलपंप सुरू होतील, असा विश्वास पेट्रोलपंप असोसिएशनने व्यक्त केला आहे.(40 percent petrol pumps in city closed due to strike nashik truck driver strike news)

जिल्ह्यात एकूण ५६० पेट्रोलपंप आहेत. त्यापैकी शहरात ११० पेट्रोलपंप संख्या असून, जिल्ह्यासाठी दोन लाख ७५ हजार लिटर इंधनाची आवश्यकता असते. हे सर्व इंधन मनमाडजवळील पानेवाडी येथून वितरित होते. फक्त नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्ट्रासह मराठवाड्यातील १२ जिल्ह्यांना येथून पुरवठा होतो.

हीट ॲन्ड रन या सुधारित कायद्याच्या विरोधात वाहतूकदारांनी दोन दिवस संप पुकारल्याने बुधवारीही त्याचा परिणाम शहरात जाणवला. स्वतःचे टँकर असलेल्या पेट्रोलपंप चालकांचा इंधन पुरवठा सुरळीत झाल्याचे दिसून आले. ज्यांना टँकर उपलब्ध होऊ शकले नाही, त्यांना गुरुवारी टँकरने इंधन पुरवठा होईल. प्रत्येक जिल्ह्यातून होणाऱ्या मागणीचा विचार करून एका दिवसात साधारणतः शंभर ते दीडशे टँकर सोडले.

त्यामुळे पेट्रोलपंप बंद दिसत असले तरी इंधनाचा तुटवडा नागरिकांना भासला नाही. शहरातील काही पेट्रोलपंप बंद असल्यामुळे ज्या ठिकाणी पेट्रोल मिळत होते, तिथेच नागरिकांची जास्त गर्दी झाल्याचे दिसून आले. जास्त पेट्रोल भरण्याकडेही नागरिकांचा कल दिसून आला. संपाविषयी अनभिज्ञ असलेल्या लोकांनी नियमितपणे पेट्रोल भरल्याचेही दिसून आले.

यापुढे कुठलाही बंद नाही

वाहतूकदारांच्या संपाला विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवला होता. त्यांनी वेगवेगळ्या दिवशी बंदचे आवाहन केले होते. पण हा संपच मिटल्याने यापुढे कुठल्याही प्रकारचा बंद राहणार नसल्याचे ट्रान्स्पोर्ट असोसिएशन, रिक्षाचालक श्रमिक सेना व इतर वाहतूकदारांनी जाहीर केले आहे.

''विविध जिल्ह्यांतून एकाच वेळी पेट्रोलची मागणी आल्याने सर्वांना पुरवठा करणे शक्य झाले नाही. कोठेही टंचाई जाणवणार नाही, या दृष्टीने वितरणाचे नियोजन केले आहे. गुरुवार (ता. ४) पासून जिल्ह्यातील शंभर टक्के पेट्रोलपंप सुरू होतील.''- भूषण भोसले, डिस्ट्रिक्ट पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असो.

''पेट्रोल घेण्यासाठी आजच आल्यामुळे बंदविषयी मला काही माहिती नव्हते. पण एक-दोन पेट्रोलपंप बंद दिसले म्हणून तिसऱ्या ठिकाणी पेट्रोल भरले.''- तनिष्क पाटील, युवक

''दोन दिवस पेट्रोल न मिळाल्याने गाडी घराबाहेर काढली नाही. पेट्रोलपंप बंद असल्यामुळे ज्या ठिकाणी पेट्रोल मिळाले तिथे भरले.''-राहुल महाले, नागरिक

''पेट्रोल भरण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण कोठे ऑनलाइन पेमेंट स्वीकारत नव्हते, तर काही ठिकाणी पेट्रोल मिळत नव्हते. आज पेट्रोल मिळाल्याने गाडी बाहेर काढली.''-तुषार बोरसे, नागरिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : देशभरात संध्याकाळी पाचपर्यंत ५६.६८ टक्के मतदान; महाराष्ट्रात जम्मू काश्मीरपेक्षाही कमी मतदान शिंदे

Ebrahim Raisi : इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमुळं भारतात उद्या राष्ट्रीय दुखवटा जाहीर

Helmet Man : दागिने, घर, जमीन विकून हा व्यक्ती लोकांना फुकटात वाटतोय हेल्मेट,राघवेंद्रचे होतंय कौतूक

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT