Sanitation Superintendent collecting fine from shopkeepers for plastic usage.
Sanitation Superintendent collecting fine from shopkeepers for plastic usage. esakal
नाशिक

6 महिन्यात सहाशे किलो प्लॅस्टिक जप्त; 9 लाखाचा दंड वसूल

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेच्या (NMC) घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून गेल्या सहा महिन्यात प्लॅस्टिक बंदीची (Plastic Ban) कारवाई तीव्र करत १७४ केस दाखल करून त्यांच्याकडून नऊ लाख पाच हजार रुपये दंड वसूल केला आहे. कारवाईत एकूण सहाशे किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.

महापालिकेकडून पर्यावरण रक्षणासाठी स्वच्छतेसंदर्भात प्रभावीपणे जनजागृती करताना प्लॅस्टिक न वापरण्याचे आवाहन दुकानदारांना केले आहे. जनजागृतीच्या माध्यमातून प्लॅस्टिक बंदीची प्रभावीपणे अंमलबजावणी करताना दंडात्मक कारवाईदेखील करण्यात आली आहे. (600 kilos of plastic seized in 6 months 9 lakh fine recovered nashik Latest Marathi News)

जानेवारी महिन्यात ३५ केस करण्यात आल्या. त्यातून एक लाख ९५ हजार रुपये दंड व ८६ किलो प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. फेब्रुवारी महिन्यात १६ केस करण्यात आल्या, त्यातून ८० हजाराचा दंड व ४५ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.

मार्च महिन्यात ३८ केस झाल्या, त्यातून एक लाख ९५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला, तर ९५ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. एप्रिल महिन्यात ११ केस करण्यात आल्या. ५५ हजार रुपये दंड करताना २२ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.

मे महिन्यात ५२ केस झाल्या, त्यातून दोन लाख ६५ हजार रुपये दंड व २९५ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. जून महिन्यात २२ केस करण्यात आल्या. एक लाख पंधरा हजार रुपये दंड वसूल करताना ५७ किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले.

सहा महिन्यात एकूण सहाशे किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले. प्लॅस्टिक बाळगणाऱ्यांना किंवा विकणाऱ्यांना पहिल्या गुन्ह्यात पाच हजार रुपये, तर दुसऱ्यांदा प्लॅस्टिक विकताना आढळल्यास दहा हजार रुपये दंड केला जातो.

तिसऱ्यांदा प्लॅस्टिकची विक्री किंवा खरेदी केल्यास २५ हजार रुपयांचा दंड आकारला जात असल्याची माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ आवेश पलोड यांनी दिली.

प्लॅस्टिकचे होणार रिसायकलिंग

जप्त करण्यात आलेल्या प्लॅस्टिकचे रिसायकलिंग केले जाणार आहे. पाथर्डी प्रकल्पावर नाशिक वेस्ट मॅनेजमेंट प्रकल्पात प्लॅस्टिकवर प्रक्रिया होईल. प्लॅस्टिकचे तुकडे करून त्याचे रूपांतर बारीक दाण्यांमध्ये केले जाते.

उत्पादित प्लॅस्टिकचे दाणे कंपन्यांना देऊन त्यापासून पुनरुत्पादन होते. दुसऱ्या प्रकल्पामध्ये सुका कचऱ्यातून जमा झालेल्या प्लॅस्टिकमधून इंधन निर्मिती केली जाते. त्याला आरडीएफ म्हणजेच रिफ्युज डिरायव्हड फ्युएल म्हटले जाते. हे आरडीएफ सिमेंट उद्योगाला पुरवले जाते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Qualifier 1 : दोन्ही अय्यरची अर्धशतके; केकेआरने हैदराबादला मात देत गाठली फायनल

Rahul Gandhi on Pune Porsche Accident: पुणे पोर्शे दुर्घटनेवरून राहुल गांधींनी PM मोदींवर सोडलं टीकास्त्र, म्हणाले 'दोन भारत...'

Pune Porsche Accident : पब चालविणे गंमत आहे का? पुणे पोर्शे अपघातप्रकरणी न्यायालयाचे आरोपींना खडेबोल

Sambit Patra : भगवान जगन्नाथांबद्दल बोलताना जीभ घसरली, भाजपचे संबित पात्रा करणार तीन दिवस उपवास, नेमकं काय म्हणाले होते?

Moringa Powder : आडवी तिडवी सुटलेली ढेरी कमी करते या पानांची पावडर, जाणून घ्या मोरिंग्याचे पाणी पिण्याचे फायदे

SCROLL FOR NEXT