accident
accident esakal
नाशिक

मुंबई-नाशिक महामार्गावरील थरार! 3 बालिकांसह तरुण गाडीखाली चिरडले

गोपाळ शिंदे

घोटी/इगतपुरी (जि.नाशिक) : मुंबई-नाशिक मार्गावर मुंढेगाव (ता. इगतपुरी) शिवारात आयशरने दुचाकीला धडक दिल्याने तीन बालिकांसह तरुण जागीच ठार झाला. या घटनेमुळे संपूर्ण मुंढेगाव हादरले असून, प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरले होते. यामुळे गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. काय घडले नेमके?

चाकाखाली चिरडले 4 जण

तुषार हरी कडू (वय २५) दुचाकीने (एमएच १५, एफडब्ल्यू ०४६०) घोटीहून मुंढेगावकडे घरी परतत होते. त्यांच्यासोबत दुचाकीवर पायल ज्ञानेश्‍वर गतीर (११), विशाखा ज्ञानेश्‍वर गतीर (७, दोघी रा. मुंढेगाव) व साक्षी ऊर्फ ईश्‍वरी हिरामण डावखर (१०, रा. गिरणारे, ता. इगतपुरी) ही बालके होती. मुंढेगाव चौफुलीलगत मागून येत असलेल्या आयशरने वाहनाने दुचाकीला कट मारला. त्यामुळे चौघेही दुचाकीवरून थेट आयशर वाहनाखाली पडल्याने चाकाखाली चिरडले गेले. अपघातानंतर आयशरचालक वाहनासह पळून गेला. सोमवारी (ता. ८) सायंकाळी पाचच्या सुमारास हा अपघात झाला.

संपूर्ण मुंढेगाव हादरले

अपघाताची माहिती मिळताच टोल प्रशासन, घोटी पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेत चौघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती. डोक्यातून प्रचंड रक्तस्राव झाल्याने चौघांचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघातामुळे संपूर्ण मुंढेगाव हादरले असून, प्रचंड जनसमुदाय रस्त्यावर उतरून अपघातग्रस्तांना मदत करताना दिसून आले. गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घोटी ग्रामीण रुग्णालयातही आप्तस्वकीयांसह नागरिकांची गर्दी झाली होती. दरम्यान, या अपघातामुळे मुंढेगाव परिसर आणि इगतपुरी तालुक्यात भयाण शोककळा पसरली आहे. घोटी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रद्धा गंधास, हवालदार प्रकाश कासार, लहू सानप, शीतल गायकवाड, मथुरे आदी तपास करीत आहेत.

मुंढेगाव चौफुलीला ‘ब्लॅक स्पॉट’ घोषित करत येथे उड्डाणपुलाचे काम व्हायला पाहिजे, अशी मागणी आम्ही ग्रामस्थांनी यापूर्वीही केली आहे. मात्र, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. या ठिकाणी अनेक अपघात होऊन शेकडो निरपराध जीव गेले. त्यामुळे आता तरी तातडीने उड्डाणपुलाचे काम सुरू करावे; अन्यथा आगरी सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल.

-सिद्धेश्‍वर आडोळे, संपर्कप्रमुख, आगरी सेना

ग्रामस्थांच्या मागणीला राष्ट्रीय महामार्ग व टोल प्रशासनाने नेहमीच केराची टोपली दाखवून दुर्लक्ष केले आहे. याच मार्गावर बांधलेल्या मोरीच्या चुकीच्या धोरणामुळे अपघातात वाढ झाली आहे. उड्डाणपुलाचे कामकाज सुरू करावे; अन्यथा आम्ही मुंबई-नाशिक महामार्ग बंद करू.

-राजू गतीर, माजी ग्रामपंचायत सदस्य, मुंढेगाव

आजपर्यंत अनेक अपघात झाले. यात अनेक निष्पाप जीव गेले. यावर प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अन्यथा रास्ता रोको निश्‍चित आहे.

-चंद्रकांत गतीर, माजी सरपंच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT