arrested
arrested  esakal
नाशिक

Nashik Crime News : पोलिस महासंचालक कार्यालयात धिंगाणा घालणाऱ्याला अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गडकरी चौक येथील विशेष पोलिस महासंचालक यांच्या दक्षता कार्यालय आवारात संशयिताकडून धिंगाणा घालत पोलिसांना शिवीगाळ केल्याची घटना घडली. विनोद मधुकर पाटील (रा. धुळे) असे संशयिताचे नाव आहे. (Arrested for causing trouble in office of Director General of Police Nashik Crime News)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सहा वर्षांपूर्वी पत्नीने घरातून सामान आणि पैसे चोरून नेल्याचे सांगत कार्यालय आवरत आरडाओरड करून धिंगाणा घातला. मुंबई नाका बीट मार्शल घनश्याम पवार आणि अनिल आव्हाड यांना माहिती मिळाली. यांनी घटनास्थळी दाखल होत संशयिताची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

त्याने त्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. सार्वजनिक ठिकाणी शांतता भंग करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. घटनास्थळ भद्रकाली पोलिस ठाणे कक्षात येत असल्याने त्यास त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

घनश्याम पवार यांच्या तक्रारीवरून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यास न्यायालयात हजर केले असता त्याची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market: शनिवारी खुला राहणार शेअर बाजार; NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग सत्र, जाणून घ्या तपशील

Manoj Jarange: मनोज जरांगे यांची प्रकृती बिघडली, दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Shahrukh Khan & Karan Johar : "शाहरुख आणि करण आहेत गे !" दाक्षिणात्य गायिकेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ

Swati Maliwal Assault: स्वाती मालीवाल प्रकरणात नवा ट्विस्ट! 13 मे चा बिभव कुमारांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ आला समोर

IPL 2024: रोहित मुंबईकडून वानखेडेवर लखनौविरुद्ध खेळणार शेवटचा सामना? सोशल मीडियावर चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT