attempt to self immolate farmer in front of bharti pawar nashik news 
नाशिक

Nashik Unseasonal Rain Damage: मंत्र्यांसमोरच शेतकऱ्याचा आत्मदहन करण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Nashik Unseasonal Rain Damage: जगून फायदा काय... कांद्याचे नुकसान झाले... सगळं वाटोळं झालं, असं म्हणत तळेगाव रोही (ता. चांदवड) येथील शेतकऱ्याने केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्यासमोरच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न शुक्रवारी (ता. १) केला.

अचानक झालेल्या या प्रकाराने डॉ. पवारही अचंबित झाल्या. या वेळी त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देत शांत करण्याचा प्रयत्न केला. (attempt to self immolate farmer in front of bharti pawar nashik news)

गारपिटीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी मंत्री पवार तळेगाव रोही येथे गेल्या होत्या, त्या वेळी शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. तळेगाव रोही व परिसरात गारपिटीने प्रचंड नुकसान झाले आहे. अगोदरच दुष्काळी परिस्थिती, त्यात पाणी विकत आणून कांदे व फळबागा जगविल्या.

गारपिटीने या बागा व कांद्याचे संपूर्ण पीक नष्ट झाले, त्यामुळेच या परिसरातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. त्याच उद्विग्नतेतून तळेगाव रोही येथील रामदास लक्ष्मण केदारे यांनी केंद्रीय मंत्र्यांसमोरच आत्मदहनाचा प्रयत्न केला. त्यांचे तळेगाव रोही येथे दोन एकर कांद्याचे पीक होते. पाणी कमी असल्याने त्यांनी टँकरने पाणी विकत आणून कांद्याचे पीक जगविले. त्यासाठी त्यांनी कर्ज काढून हजारो रुपये खर्च केले होते.

गारपिटीने कांद्याचे संपूर्ण नुकसान झाल्याने आता कर्ज फेडायचे कसे, या विवंचनेत ते होते. सरकारही काही मदत करीत नाही, आता जगून तरी करायचं काय, असं म्हणत त्यांनी चक्क अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांना आवरत शांत केले. डॉ. पवार यांनीही शेतकऱ्याला दिलासा देत सरकारकडून लवकरच मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

"जगून काय करणार, मी यावर्षी घरी दिवाळीही नाही केली. मी हजार रुपये टँकरने ५२ टँकर पाणी आणून कांदा जगविला. आता कांद्याचे नुकसान झाल्याने कर्ज फेडू तरी कसं, मग मेलेलं बरं. सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण नुकसानीची मदत करावी व संपूर्ण कर्ज माफ करावे." - रामदास लक्ष्मण केदारे, शेतकरी, तळेगाव रोही

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT