Bhat Kuldeep Parihar of Rajasthan while providing genealogical information to Shivaji Shinde.
Bhat Kuldeep Parihar of Rajasthan while providing genealogical information to Shivaji Shinde.  esakal
नाशिक

Nashik News : 7 पिढ्यांचा लेखाजोखा सांगत दारोदार भटकंती; राजस्थानातील भाटांचे निफाड तालुक्यात आगमन

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मूळचे राज्यस्थानातील मदनगंजचे असलेले कुलदिप परिहार यांचा वंशपरंपरागत कुटुंबियंच्या नोंदी ठेवण्याचा पारंपरिक व्यवसाय. (Bhat Kuldeep Parihar of Rajasthan provide genealogical information to niphad villagers nashik news)

सध्या ते निफाड तालुक्यातील शिवडी व देवपुर येथे असून या गावातील स्थानिक कुळांचा पूर्वेइतिहास, त्यांचे झालेले स्थलांतर, मूळ गाव, वतनदारी मिळालेले गाव, जात, गोत्र, कुलदैवत, कुलदेवीचा कुलाचार याची नोंद त्यांच्याकडे आहे. त्यात वेळोवेळी दुरूस्ती करण्यात आलेली आहे.

गेल्या सात आठ पिढ्यांचे दप्तर त्यांच्याकडे सुस्थितीत असून ती माहिती ते नव्या पिढीला देत आहेत. साधारणतः पाच ते आठ वर्षातून ते एकदा येत असतात. त्यांच्या येण्याने आपल्याला कुटूंबातील अनेक गोष्टींची नसलेली माहितीही मिळते हा यातील आनंद वेगळा असतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पाच ते आठ वर्षातून एकदा नमूद गावातील कुळांना भेटी द्यायच्या. त्यांच्या गेल्या सात पिढ्यांची वंशावळीची माहिती द्यायची. कुटुंबातील मुला‌मुलींच्या लग्नाची, नातेसंबधांची माहिती नमूद करून घ्यायची. कुटुंबातील‌ व्यक्तीच्या मृत्यूची अन नवजात बालक बालिकेची माहिती नोंद करून घेतली जाते.

संपूर्ण नोंदी अद्ययावत‌ करायच्या, असा शिरस्ता सुरु आहे. दिलेल्या माहितीच्या मोबदल्यात रोख दक्षिणा, कपडे, साडीचोळी, धान्य असे साहित्य गोळा करायचे असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे. मात्र त्यांच्याकडे असलेल्या नोंदी या खानदानाचा पूर्वेइतिहास अचूकपणे सांगत असल्याने कुटुंबातील आबालवृध्दांसह सारेच जण या भाटांकडून मिळणारी माहिती बारकाईने श्रवण करतात.

आपल्या दप्तरीही नोंदवून ठेवतात. आपले पूर्वज, त्यांचे मूळ गाव, गत पिढ्यांचे झालेले स्थलांतर अन कुटुंबाचा विस्तार याची माहिती घराघरात तुटपुंज्या मानधन दक्षिणा स्वीकारुन देणारे भाट अशा माहितीचा खजाना घेऊन परंपरेप्रमाणे गावोगाव भटकंती करत आहेत.

"राज्यस्थानातून निघाल्यावर मजल- दरमजल करत गावागावात पोहचायचे. तेथेच घरोघरी जाऊन सर्व कुळांची माहिती देत राहणे असा दिनक्रम आहे. पाच वर्षातनू एकदा यावेच लागते, तशी आमची खानदानी परंपरा आहे.

प्रत्येक कुळाची स्वतंत्र नोंदवही सोबत असते. त्याचबरोबर एक नोंदवही मूळ गावीदेखील ठेवलेली असते. मूळ गावी जाताच नव्याने कुळांची मिळालेली माहिती अद्ययावत करून घेतली जाते." - कुलदिप परिहार, भाट मदनगंज (राज्यस्थान)

"भाटांकडे असलेल्या नोंदी या तंतोतंत, बरोबर असतात. दर पाच वर्षांनी ते गावी येऊन नविन कौटुंबिक बदल अथवा नातेसंबंधाची नोंद घेतात. या माहितीमुळे आपले मूळ गाव, नातेसंबंध, वतनदारी, व्यवसाय, प्रतिकूल बाबी याची इत्यंभूत माहिती तसेच कुलदेवी कुलदैवत याची माहिती मिळते." - शिवाजी शिंदे, शिवडी (ता. निफाड).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

IPL 2024 : लाजिरवाण्या पराभवासह मुंबई इंडियन्सचा प्रवास थांबला; पांड्या म्हणाला, फक्त हा सामनाच नव्हे तर...

Share Market Today: शेअर बाजाराच्या विशेष सत्रात आज कोणते शेअर्स असतील तेजीत? काय आहे तज्ज्ञांचा अंदाज

SCROLL FOR NEXT