Vasant Vyakhyanmala
Vasant Vyakhyanmala esakal
नाशिक

Vasant Vyakhyanmala : वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्ष ज्ञानयज्ञ १ मेपासून; दिग्गजांची राहणार उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा

Vasant Vyakhyanmala : सांस्कृतिक मानबिंदू ठरलेल्या वसंत व्याख्यानमालेच्या शताब्दी वर्षाच्या ज्ञानयज्ञात ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कोकणी साहित्यिक दामोदर मावजो, इंग्रजी भाषेत १३ कादंबऱ्या लिहीत त्यातील ५ कादंबऱ्यांवर चित्रपट देणारे लेखक चेतन भगत, पासपोर्ट मॅन डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे, ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचा सहभाग असेल. (Centenary year of Vasant Vyakhyanmala from May 1 nashik news)

व्याख्यानमालेच्या उद्‌घाटन सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करण्यात आले आहे. व्याख्यानमालेचा समारोप ३१ मेस सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘ या कार्यक्रमाने होईल.

अभिनेत्री सई ताम्हनकर, अभिनेते प्रसाद ओक, सूत्रसंचालक प्राजक्ता माळी, अरुण कदम, समीर चौगुले यांच्यासह २५ कलावंतांचा त्यात सहभाग असेल. वसंत व्याख्यानमाला शताब्दी वर्ष स्वागत समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री दादा भुसे आणि व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी शनिवारी (ता. १५) शताब्दी वर्ष कार्यक्रमाची घोषणा केली.

गोदाघाटावरील देवमामलेदार यशवंतराव महाराज पटांगणावर १ ते ३१ मे या कालावधीत दररोज सायंकाळी सातला होणाऱ्या व्याख्यानमालेत डॉ. रवी गोडसे, चंद्रशेखर चव्हाण, बृहन्महाराष्ट्र मंडळाचे माजी अध्यक्ष ॲड. नितीन जोशी, विद्या जोशी हे अमेरिकेतील वक्ते विचार मांडतील.

मूळचे कोपरगावचे आणि फ्रान्समध्ये कामगिरी करणारे अमित केवल, अकोले तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेले आणि आता दक्षिण कोरियातील सेऊल विद्यापीठातील प्रा. डॉ. रोहिदास आरोटे, स्वीडनमधील विचारवंत इश्तीयाक अहमद, लंडनमधील शिक्षणतज्ज्ञ माधवी आमडेकर,

संरक्षण साहित्याचे जर्मनीमधील पुरवठादार भरत गिते, महिला वैमानिक कॅप्टन निलम इंगळे, पर्यावरण क्षेत्रात ९ देशांमध्ये कामगिरी करणारे प्रसाद सेवेकरी, दुबई मधील पेशवा शाकाहारी हॉटेलच्या संचालिका श्रिया जोशी हेही वक्ते असतील.

श्री. जोशी व श्री. सेवेकरी हे मूळचे नाशिकमधील आहेत. श्री. मावजो यांची कोकणी आणि मराठी भाषा भगिनी म्हणून ओळखल्या जात असल्याने श्री. मावजो यांचा नागरी सन्मान करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र सरकार आणि नाशिक महापालिका तसेच देणगीदारांच्या सहकार्याने व्याख्यानमालेची तयारी श्री. भुसे, श्री. बेणी यांच्यासह विजय हाके, उषा नवलनाथ तांबे, प्रा. संगीता राजेंद्र बाफणा, मनीष सानप, हेमंत देवरे, गणेश भोरे, ॲड. हेमंत तुपे, अविनाश वाळुंजे, सुनील गायकवाड, रुचिता ठाकूर, ॲड. कांतिलाल तातेड, विजय काकड, प्रा. कृष्णा शहाणे, संदीप नाटकर हे करत आहेत.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

दिवसनिहाय वक्ते आणि विषय

व्याख्यानमालेची महिनाभराची कार्यक्रम पत्रिका पुढीलप्रमाणे
० २ मे-लोकशाहीर कृष्णराव साबळे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त डॉ. गणेश चंदनशिवे, डॉ. प्रकाश खांडगे यांच्यासह मुंबईच्या यशराज कलापथकाचा कार्यक्रम (रंग शाहिरीचे)
० ५ मे- प्रा. रोहिदास आरोटे (विज्ञानाशी जडले नाते)
० ६ मे- पुण्यातील प्रसाद सेवेकरी (आपत्ती व्यवस्थापन, मानवतावाद आणि आपण)
० ७ मे-नवी दिल्लीतील डॉ. रमण गंगाखेडकर (भारताचा कोरोनाविरुद्धचा लढा)
० ८ मे-माऊंट अबूच्या ब्रह्माकुमारी संतोष दीदी (आध्यात्मिक ज्ञानद्वारे जीवनात सुख शांती की प्राप्ती)
० ९ मे-स्वीडनमधील इश्‍तियाक अहमद (जत्रेत हरवलेल्या दोन भावांची कथा, भारत-पाकिस्तान आणि त्यांचे वेगवेगळे, सामाजिक-राजकीय मार्ग आणि त्यांनी एकमेकांशी कसे वागावे, एक सूचना)
० १० मे-नागपूरचे कृषीतज्ज्ञ सी. डी. मायी (भविष्यातील भारतीय शेती)
० ११ मे-दुबईमधील सचिन-श्रिया जोशी (प्रवास एका अन्नपूर्णेचा)

० १२ मे-पुण्यातील साखर आयुक्त शेखर गायकवाड (प्रशासनाकडून जनतेच्या अपेक्षा)
० १३ मे-पुण्यातील अनुरूप विवाह संस्थेच्या डॉ. गौरी कानिटकर (विवाह संस्थेचे बदलते स्वरूप)
० १४ मे-सोलापूरचे शिवचरित्रकार शिवरत्न शेटे (शिवशंभू : पितापुत्रांचे अविस्मरणीय भावबंध)
० १५ मे-गोव्याचे ज्ञानपीठकार दामोदर मावजो (श्रेयस की प्रेयस)
० १६ मे-लंडनमधील माधवी आमडेकर (विद्यमान शैक्षणिक व्यवस्था आणि भवितव्य)
० १७ मे-हैदराबादमधील विशेष पोलिस महानिरीक्षक महेश भागवत (स्पर्धा परीक्षा आणि महाराष्ट्रातील युवक)
० १८ मे-अमेरिकामधील ॲड. नितीन जोशी (अमेरिकेतील मराठी समाज, काल-आज-उद्या याबाबत मुलाखत)
० १९ मे-अमेरिकेतील डॉ. रवी गोडसे (वैद्यक शास्त्रातील विनोद)
० २० मे-मुंबईच्या एअर इंडियाच्या पायलट कॅप्टन निलम इंगळे (नभांगण)
० २१ मे-फ्रान्समधील अमित केवल (वाइन @ नाईन, भारतीय वाइन उद्योगाला आकार देणारे ९ बदल)
० २२ मे-नवी दिल्लीतील चेतन भगत (नेतृत्वगुण, मूल्य यांच्या बळावर जीवनातील सर्वोच्च उद्दिष्ट कसे गाठावे?)
० २३ मे-अमेरिकेतील डॉ. चंद्रशेखर चव्हाण (नेत्र आणि दृष्टी)
० २४ मे-जर्मनीतील भरत गिते (मेक इन इंडिया-पायाभूत सुविधा क्षेत्र)
० २५ मे-नागपूरमधील ज्येष्ठ पत्रकार देवेंद्र गावंडे (महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील नागरिक शेजारच्या राज्यांच्या प्रेमात का?)
० २६ मे-नवी दिल्लीमधील माजी परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्‍वर मुळे (देशविदेशातील अदभूत अनुभव)
० २७ मे-ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई (भारतातील सद्य राजकीय स्थिती)
० २८ मे-ठाण्यातील प्रा. धनश्री लेले (महाकवी सावरकर)
० २९ मे-अमेरिकेतील विद्या जोशी (भारताबाहेरील भारत)
(१ मे, ३ मे, ४ मे आणि ३० मेरोजीचे वक्ते व विषय नंतर जाहीर होणार आहेत)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदेंचा दणका; अंबरनाथचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांचा 7 माजी नगरसेवकांसह शिवसेनेत प्रवेश!

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Irrfan Khan: जेव्हा राजेश खन्ना यांच्या घरी AC दुरुस्त करायला गेला होता इरफान खान; हा किस्सा माहितीये का?

Besan Pohe Cutlet : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा चवदार बेसन पोहे कटलेट, वाचा सोपी रेसिपी

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

SCROLL FOR NEXT