Agitation
Agitation esakal
नाशिक

Nashik: जलजीवनच्या कामातील अनागोंदी प्रशासनाकडून डोळ्याआड! त्या ठेकेदाराच्या हमीनंतर वावीतील उपोषणाची सांगता

अजित देसाई

वावी : सिन्नर तालुक्यातील वावी येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय पेयजल योजनेच्या कामाची गुणवत्ता ढिसाळ असल्याचा प्रकार उघड होऊन देखिल प्रशासकीय यंत्रणा मात्र ठेकेदाराची पाठ राखण करत असल्याचे चित्र आहे.

या निकृष्ट कामांची चौकशी व्हावी, तसेच ठेकेदारास जबाबदार धरून त्याचे विरुद्ध कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी उपोषण करणाऱ्या गावातील तरुणांना ठेकेदाराच्याच लेखी हमीनंतर उपोषण मागे घेण्यात अधिकाऱ्यांना यश आले. (Chaos in work of jal jeevan hidden from administration After assurance of that contractor hunger strike in Wavi ended Nashik)

वावी ग्रामपंचायतचे माजी सदस्य दीपक वेलजाळी, सामाजिक कार्यकर्ते गणेश वेलजाळी, किरण संधान यांचेसह स्थानिक तरुणांनी जलजीवन योजनेच्या निकृष्ट कामांची पोलखोल केल्यानंतर धाबे दणाणलेल्या ठेकेदाराने रात्रीचा दिवस करत अर्धवट खोलीवर टाकलेली जलवाहिनी नव्याने करण्याचा घाट घातला होता.

मात्र त्याला विरोध करत तरुणांनी आमरण उपोषण आंदोलन सुरू केले होते. प्रशासकीय पातळीवरून वावीतील कामासंदर्भात ठेकेदाराची पाठराखण होत असल्याचे सुरुवातीपासूनच दिसत होते.

सहा महिन्यांपूर्वी केलेल्या कामांचे आराखडे रात्रीतून डिजिटल फ्लेक्स द्वारे ठीक ठिकाणी लावण्यात आले. संगमनेर येथील फड नामक ठेकेदाराने सुमारे सव्वा दोन कोटी रुपये प्रशासकीय मंजुरी असलेल्या या योजनेचे काम घेतले आहे.

सदर ठेकेदार पाणीपुरवठा योजनेतील मोठा व अनुभवी ठेकेदार मानला जातो. मात्र वावी येथील करण्यात आलेल्या कामात केवळ धूळफेक करण्यात आली होती. कामे निकृष्ट होत असल्याचे सिद्ध होऊन देखील प्रशासकीय यंत्रणांनी या ठेकेदाराला वाचवण्याची पुरेपूर दक्षता घेतली.

निकृष्ट कामांबद्दल सारवासारव करत गावातील यापूर्वी टाकण्यात आलेल्या सर्व जलवाहिन्या नाबार्ड या यंत्रणेच्या देखरेखीखाली नव्याने टाकण्यात येतील. गावातील प्रत्येक वाडी वस्तीवरील कुटुंबापर्यंत नळाने पाणी देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

तसेच योजनेतील राहिलेली कामे देखील योग्य पद्धतीने करून घेतली जातील असे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले. प्रजासत्ताक दिनी ठेकेदाराने उपोषण करणाऱ्या तरुणांची भेट घेऊन त्यांना हमीपत्र लिहून दिले.

चोरानेच तिजोरीची राखण प्रामाणिकपणे करण्याचे आश्वासन दिल्याचा हा प्रकार हास्यस्पद म्हणावा लागेल. ठेकेदाराच्या लेखी हमीनंतर अधिकाऱ्यांनी उपोषण करणाऱ्या तरुणांची मनधरणी करत हे आंदोलन स्थगित करण्यात यश मिळवले.

प्रशासकीय यंत्रणेकडून उपोषण सोडते वेळी लेखी स्वरूपात कोणताही खुलासा देण्यात आला नाही. ठेकेदाराने साध्या कागदावर लिहून दिलेल्या हमीपत्रावर देखील साक्षीदार म्हणून एकाही अधिकाऱ्याने सही केली नाही.

वावी गावातील तरुणांनी योजनेतील मोठा घोळ उघडकीस आणल्याबद्दल त्यांचे कौतुक करण्यात येत असले तरी ठेकेदाराची हमी घेण्याऐवजी प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरून हे उपोषण सोडले असते तर पुढच्या काळात ते अधिक प्रभावी ठरले असते अशी चर्चा होत आहे.

ठेकेदाराने लिहून दिलेल्या हमीपत्रात वावी गावातील जलजीवांची कामे निकृष्ट पद्धतीने झाली असल्याची कबुली दिली आहे. नावाजलेला ठेकेदार असलेल्या फड यांच्याकडून मुळातच अशा पद्धतीने निकृष्ट कामांची अपेक्षा नाही.

स्थानिक तरुणांनी या अगोदर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना योजनेतील अनागोंदी बाबत लेखी निवेदन दिले आहे. मात्र त्याची देखील प्रशासकीय पातळीवर कुठेही दखल घेतली गेली नाही.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी जलजीवनच्या कामांमध्ये अनागोंदी सुरू असली तरी अधिकाऱ्यांकडून प्रत्येक ठिकाणी ठेकेदाराची पाठ राखण केली जाते. तक्रारी उपस्थित झाल्यावर कामात सुधारणा करण्याची हमी दिली जाते. त्यामुळें हर घर जल हा योजनेचा उद्देश कसा साध्य होईल असा प्रश्न आहे.

"जलजीवन च्या कामात यापूर्वी झालेली कामे निकृष्ट असल्याची बाब अधिकारी आणि स्वतः ठेकेदाराने मान्य केली आहे. ही सर्व कामे नियमानुसार पूर्ववत केली जातील तसेच नवीन कामे देखील पारदर्शी पद्धतीनेच पूर्ण केली जातील अशी हमी ठेकेदारासह नाबार्ड या शासकीय यंत्रणेकडून लेखी स्वरूपात मिळाली आहे. ठेकेदारावर कारवाई झाली नाही हा प्रशासकीय भाग आहे. आम्ही उपोषणास बसलो म्हणूनच यंत्रणा गावात पोहोचली ही सत्यता आहे."

- गणेश वेलजाळी, आंदोलक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''तब्येत खराब आहे तर प्रचार का करता?'', भर कोर्टात ED ने केजरीवालांना केला सवाल, म्हणाले...

T20 World Cup 2024 : आयसीसीनं स्पर्धेतील प्रमुख संघाची जर्सी केली बॅन! टी20 वर्ल्डकपला वादाची किनार?

Israel on All eyes on Rafah : 7 ऑक्टोबरला तुमचे डोळे फुटलेले का? इस्रायलचे 'त्या' व्हायरल फोटोला प्रत्युत्तर

Pune Porsche Accident: कारच्या फिचरमुळं सापडला कल्याणीनगर अपघातातला अल्पवयीन आरोपी नाहीतर...; प्रत्यक्षदर्शीने सांगितली हकीकत

Amruta Khanvilkar: मराठमोळी अमृता खानविलकर झळकणार हिंदी वेब सीरिजमध्ये; '36 डे ' चा ट्रेलर पाहिलात का?

SCROLL FOR NEXT