केजरीवाल सरकार अस्थिर! भाजपने आपच्या 7 आमदारांना दिली प्रत्येकी 25 कोटींची ऑफर?

7 AAP MLAs Offered 25 Crore By BJP: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला आहे. भाजप आपचे सात आमदार खरेदी करु पाहात आहे.
 7 AAP MLAs Offered 25 Crore By BJP
7 AAP MLAs Offered 25 Crore By BJP

नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर गंभीर आरोप केला आहे. भाजप आपचे सात आमदार खरेदी करु पाहात आहे. तसेच दिल्लीतील सरकार अस्थिर करण्यसाठी भाजपने आमदारांना प्रत्येकी तब्बल २५ कोटी रुपये ऑफर केलेत, असा दावा केजरीवाल यांनी केला आहे. (government in Delhi 7 AAP MLAs Offered 25 Crore By BJP said Arvind Kejriwal Big Charge)

केजरीवाल यांनी यासंदर्भात एक्सवर पोस्ट केली आहे. ते म्हणालेत की, गेल्या काही दिवसांत दिल्लीच्या सात आमदारांना संपर्क करण्यात आला आहे. काही दिवसात केजरीवाल यांना अटक करण्यात येईल. त्यानंतर आमदारांना फोडण्यात येईल.२१ आमदारांसोबत चर्चा सुरु आहे. दिल्लीतील सरकार पडणार. तुम्ही आमच्याकडे या, तुम्हाला २५ कोटी रुपये देऊ, भाजकडून तिकीट देऊ असं त्यांना सांगण्यात येतंय.

 7 AAP MLAs Offered 25 Crore By BJP
Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होणार? 'आप' नेत्यांच्या ट्वीटमुळे खळबळ

२१ आमदारांसोबत संपर्क साधल्याचं बोललं जातंय. पण, आमच्या माहितीनुसार आतापर्यंत ७ आमदारांना संपर्क साधण्यात आला आहे. मद्य घोटाळ्यात मला अटक करुन दिल्ली सरकार पाडण्याचा कट भाजप रचत आहे. गेल्या नऊ महिन्यात आमचे सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले आहेत. पण, त्यांना आतापर्यंत यश आलं नाही, असं केजरीवाल म्हणाले.

देव आणि जनता आज आमच्यासोबत आहे. आमचे सर्व आमदार खंबीरपणे आमच्या पाठिशी आहेत. त्यामुळे यावेळी देखील हे लोक यशस्वी होणार नाहीत. दिल्लीच्या जनतेसाठी आम्ही किती काम केलंय हे या लोकांना माहिती आहे. अनेक अडचणी आल्या, पण आम्ही दिल्लीच्या लोकांसाठी कामं केली. लोक आमच्यावर प्रेम करतात. त्यामुळे आम्हाला हरवणे यांना शक्य होणार नाही. मला अटक करण्याच्या बहाण्याने सरकार पाडण्याचा प्रयत्न आहे, असं केजरीवाल म्हणाले.

 7 AAP MLAs Offered 25 Crore By BJP
Loksabha Election : आप व काँग्रेसमध्ये ‘पंजाब’वरून वाद

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या अडचणीत सापडले आहेत. सक्तवसुली संचालनालयाने आतापर्यंत केजरीवाल यांना मद्य घोटाळ्या प्रकरणी अनेकवेळा नोटीस पाठवत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, केजरीवाल यांनी प्रत्येकवेळी ईडीच्या नोटिशीला केराची टोपली दाखवली आहे. येत्या काळात केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com