Beating esakal
नाशिक

Nashik Crime: जागेच्या वादातून 2 भाजी विक्रेत्यांमध्ये भररस्त्यावर हाणामारी

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : सिडकोतील त्रिमूर्ती चौक येथे दोन भाजी विक्रेत्यांमध्ये भररस्त्यावर झालेल्या हाणामारीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

तर हातात कोयता घेऊन दुसऱ्या विक्रेत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करीत असताना ऐनवेळी पोलिस घटनास्थळी पोचल्याने पुढील अनर्थ टळला. तर दोघे विक्रेत्यांनी अंबड पोलिसात एकमेकांविरोधात तक्रार दखल केल्याचे समजते. (Clash between 2 vegetable sellers on street due to space dispute Nashik Crime)

शुक्रवारी (ता. ७) दुपारी तीनच्या सुमारास त्रिमूर्ती चौक परिसरातील भाजी मार्केट परिसरात दोन भाजी विक्रेत्यांमध्ये जागेच्या वादातून वाद निर्माण झाला. एका मद्यपी विक्रेत्याने दुसऱ्या विक्रेत्याच्या दुकानावर जाऊन त्याच्यासह त्याच्या पत्नीसही मारहाण करण्यास सुरवात केली.

इतकेच नव्हे तर त्याच्या दुकानाचीही मोडतोड केली. यावर न थांबता हातात कोयता आणून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत असताना अंबड पोलिस घटनास्थळी पोचल्याने पुढील अनर्थ टळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

दोघे विक्रेत्यांना अंबड पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले. हा सर्वं प्रकार सुरु असताना येथे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी मद्यपी विक्रेत्यांचा घटनास्थळी चांगलाच समाचार घेतल्याने नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले. तर येथे नेहमीच हा मद्यपी भाजी विक्रेता इतरही लोकांना त्रास देत असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Video Viral: शुभमन गिलला समोरून जाताना पाहून काय होती सारा तेंडुलकरची रिऍक्शन? पाहा

Viral Video: धक्कादायक! लिफ्टमध्ये लहान मुलाला जबर मारहाण; ठाण्यातील संतापजनक घटना, घटनेचा व्हिडिओ व्हायरल

मराठी चित्रपटसृष्टीच्या मागण्यांबाबत राष्ट्रवादी सांस्कृतिक चित्रपट विभागाने घेतली सांस्कृतिक मंत्र्यांची भेट

धक्कादायक! एकाच कुटुंबातील चौघांचा जीव देण्याचा प्रयत्न, तिघांचा मृत्यू; घटनेमागचं कारण काय?

SCROLL FOR NEXT