Nashik News : मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातील २४ चेक पोस्ट तत्काळ बंद करण्याची मागणी मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेने राज्य सरकारकडे केली आहे.
महाराष्ट्रानंतर कर्नाटकसह इतर ११ राज्यांतील चेकपोस्ट बंद करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अमृतलाल मदान यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Close 24 checkposts in Maharashtra Appeal of Motor Owners Workers Transport Association to State Govt Nashik)
मोटर मालक संघटनेच्या मागणीनंतर मध्य प्रदेश सरकारने १३ चेक पोस्ट तत्काळ बंद केले. उर्वरित चेक पोस्ट १४ डिसेंबर २०२३ पर्यंत (एकूण ४७) बंद करण्याचा निर्णय या सरकारने घेतला आहे. गुजरातमध्येही चेकपोस्ट बंद आहेत.
त्याचप्रमणे महाराष्ट्रातील २४ चेकपोस्ट बंद करून राज्यातील २५ लाख वाहनधारकांना या त्रासापासून मुक्त करण्याची मागणी केली. वाहनांचे कागदपत्र तपासण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा आणि त्यानुसार दंड आकारणी करावी.
देशभरातील वाहन चालकांकडून ठिकठिकाणी पाचशे कोटींचा दंड आकारण्यात आला. त्यापैकी ५० टक्के दंड चुकीच्या पद्धतीने लावण्यात आले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पोलिस त्यांचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वाहनधारकांना दंड करतात, हे अत्यंत चुकीचे असल्याचे श्री. मदान यांनी म्हटले आहे. मध्य प्रदेशातील चेकपोस्ट बंद झाल्याने वार्षिक तीन हजार ६०० कोटींचा ‘झोल’ बंद झाला आहे.
महाराष्ट्रातही चेकपोस्टच्या नावाखाली सुरू असलेला व्यवहार बंद करण्याची मागणी या संघटनेने केली. संघटनेचे मध्य प्रदेशचे उपाध्यक्ष विजय कालरा, राकेश तिवारी, सी. एल. मुकाती, राजेंद्र त्रेहान यांचा संघटनेतर्फे सत्कार झाला.
मोटर मालक कामगार वाहतूक संघटनेचे अध्यक्ष सचिन जाधव, अध्यक्ष विजय कालरा, अंजू सिंगल, विजय काकडे, बाबासाहेब सानप, चिराग कटिरा, किशोर सिंग, अवतार सिंग, बिरदी राजपूत, नरेश बन्सल, अमन चौधरी, विनोद शर्मा उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.