exam
exam esakal
नाशिक

अभियांत्रिकी सत्र निकालात अंतर्गत गुण नसल्याने संभ्रम

अरूण मलाणी

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे (engineering cylabus) शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्‍या प्रथम सत्राचा (first semister) निकाल शुक्रवारी (ता. २१) जाहीर झाला. या निकालात अंतर्गत गुणांचा अंतर्भाव करण्यात आलेला नसल्‍याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम (students confusion) निर्माण झाला होता.

अभियांत्रिकी सत्र निकालात अंतर्गत गुण नसल्याने संभ्रम

शैक्षणिक वर्षाच्‍या अंतिम निकालात या गुणांचा समावेश असेल, असे स्‍पष्टीकरण महाविद्यालयांकडून दिल्‍यानंतर विद्यार्थ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला. मुळातच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ च्‍या परीक्षा विलंबाने होत आहेत. नुकतेच एप्रिल महिन्‍यात ऑनलाइन स्‍वरूपात विविध शिक्षणक्रमांची परीक्षा विद्यापीठाने घेतली. या शैक्षणिक वर्षाच्‍या प्रथम सत्राच्‍या परीक्षांचा निकाल बुधवारी (ता. २१) जाहीर झाला. मात्र, यात अंतर्गत गुण नसल्‍याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. अनेक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात संपर्क साधला. त्यावर, विद्यार्थ्यांनी घाबरून जाण्याची आवश्‍यकता नाही. शैक्षणिक वर्षाच्‍या द्वितीय सत्राची परीक्षा झाल्‍यानंतर एकत्रित निकालपत्रकात या गुणांचा समावेश असेल, अशी माहिती मिळाल्याने त्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

गुण अपलोडसाठी २५ जूनपर्यंत मुदत

यापूर्वीच विद्यापीठातर्फे जारी केलेल्‍या पत्रकात म्‍हटले आहे, की सर्व अभ्यासक्रम, सर्व वर्षांच्‍या प्रथम, द्वितीय सत्रातील विषयांच्‍या प्रात्‍यक्षिक, तोंडी, टर्मवर्क, सेमिनार, प्रकल्‍प, शोधप्रबंध आदी परीक्षा महाविद्यालय स्‍तरावर १५ जूनपर्यंत घेण्यास सांगितले आहे. या परीक्षांचे गुण व अंतर्गत गुण वेबपोर्टलवर अपलोड करण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत दिलेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT