corona report
corona report esakal
नाशिक

पुन्हा तोच घोळ! दोन वेगळ्या रिपोर्टमुळे रुग्णांचा गोंधळ

विक्रांत मते

नाशिक : एखाद्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाली किंवा नाही याबाबत तपासणी करण्यासाठी खासगी लॅबमध्ये स्वॅब दिला जातो. त्यानंतर लॅबकडून आलेल्या अहवालानुसार उपचार सुरू होतात; परंतु शहरातील काही लॅबकडून एकाच रुग्णाचे दोन वेगवेगळ्या प्रकारचे तपासणी अहवाल बाहेर येत असल्याने अनेक रुग्ण गोंधळात सापडत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा घोळ कोरोनाचे थैमान सुरू असतानादेखील सुरूच असल्याने लॅबवर नियंत्रण आणण्याची मागणी होत आहे.

अनेक रुग्ण गोंधळात

गेल्या वर्षी कोरोना संसर्ग शहरात वाढत असताना खासगी लॅबलादेखील जिल्हाधिकारी कार्यालयाने परवानगी दिली. कोरोना संसर्गाची लागण झाली की नाही याची तपासणी करण्यासाठी दोन पद्धती आहेत. पहिली पद्धत रॅपिड ॲन्टिजेन टेस्टची आहे. यात नाकातील स्राव किटमध्ये टाकल्यास अवघ्या दोन मिनिटांत कोरोनाची लागण झाली की नाही हे समजते. दुसरी टेस्ट आरटीपीसीआर प्रकारची आहे. घशातील व नाकातील दोन्ही स्राव घेऊन लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविले जातात. त्यातून कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह ते समजते. आरटीपीसीआर चाचणी शहरात खासगी लॅबच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

संभ्रमाचे वातावरण

त्यासाठी विशिष्ट शुल्क आकारले जाते. लॅबकडून आलेल्या अहवालानुसार रुग्णावर उपचार केले जातात. परंतु एकाच रुग्णाच्या दोन लॅबकडून आलेल्या अहवालांमुळे गोंधळ उडत आहे. मनोज चोरडिया यांना लॅब संदर्भात दोन वेगळे अहवाल प्राप्त झाले. सुप्रीम डायग्नोस्टिक पॅथॉलॉजीचा अहवाल निगेटिव्ह, तर दातार कॅन्सर जेनेटिक्स लॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने उपचार करावे की नाही अशी अवस्था त्यांची झाली आहे. शहरातील बहुतांश नागरिकांना दोन वेगळ्या अहवालांना सामोरे जावे लागत असल्याने संभ्रमाचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT