marriage.jpg
marriage.jpg 
नाशिक

#Coronaeffect : कोरोनामुळे लग्न सोहळ्यांवर गदा...बुकिंगचे रिफंड मिळूनही वर-वधु पित्यांचे टेन्शन कायम!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (इगतपुरी) कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणुच्या वाढत्या फैलावामुळे राज्यातील विविध शहरी भागात हातपाय पसरायला सुरुवात केल्यानंतर आता आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवला आहे. ग्रामीण या भागातील यात्रा, उत्सव, सभारंभ पुढे ढकलण्यात आले आहेत. तसेच आता केंद्र शासनाच्या 14 एप्रिलपर्यतच्या लॉकडाऊनमुळे विवाह सोहळ्यासह उर्वरित मोठे सोहळेही स्थगित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे वर-वधू पित्यांची चिंता वाढली आहे. कधी हे विघ्न जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

लग्न तारीख ठरली असूनही, लग्न मात्र करता येत नसल्यामुळे वधू पित्याची चिंता वाढली

लग्नसोहळ्यांचा थाट विशेषत: ग्रामीण भागात अधिक असतो. फेब्रुवारी मार्चपासून सुरू होणारे लग्न सोहळे अगदी जून व जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सुरू राहतात. इगतपुरी तालुक्यासह नाशिक जिल्ह्यातील शेकडो वर-वधुंचे लग्न ठरले आहे; मात्र कोरोनामुळे हे लग्नसोहळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांनी मनमानी केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे इकडे आड तिकडे विहीर असे ग्रामीण भागातील चित्र आहे. दरम्यान, या लग्नसोहळ्यामुळे केटरर्सकडे कामाला आलेले आचारी, कामगार, वाढपी, डेकोरेशनवाले, वाजंत्री बॅंडवाले, कार्यालय चालक, मंडपवाले त्यांचे कामगार यांचे रोजगार बुडाल्याने त्यांचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. तर काही वधू - वरांचे विवाह ठरले आहेत व लग्न तारीख ठरली असूनही, लग्न मात्र करता येत नसल्यामुळे वधू पित्याची चिंता वाढवणारी ठरत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.

विवाह सोहळे ठरले फायद्याचे  

अनेक वधू पित्यांनी लॉकडाऊन होण्या अगोदरच अगदी साधेपणाने लग्न उरकण्यावर भर दिला होता. अशा लग्न सोहळयांसाठी अत्यंत कमी लोक जमा झाल्याने मंगल कार्यालय, मंडप, डेकोरेशन, बॅंड आणि जेवणावळींचा फार मोठा खर्च वाचला आहे. लग्नसोहळे अत्यंत साधेपणाने दारासमोरच किंवा गावातील मंदिरात उरकण्यात आले. त्यामुळे ज्या वधू पक्ष किंवा वर पक्षाकडे लग्नसोहळा पार पाडण्याचे ठरले होते ते त्यांच्या लग्नाचा होणारा अनाठायी खर्च वाचला आहे. त्यामुळे 'कही खुशी कही गम' व्यक्त करण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: कॉंग्रेसमध्ये आता अशी वेळ आली आहे की, ते कोणाचेच ऐकत नाहीत - राजकुमार चौहान

SCROLL FOR NEXT