maha..police.jpg
maha..police.jpg 
नाशिक

चक्क पोलीस चौकीसमोरच घडला धक्कादायक गुन्हा..अन् पोलीस मात्र..

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / ओझर : येथील पोलिस चौकीसमोरून बडोदा बॅंकेत पैसे जमा करण्यासाठी आलेल्या एकाकडून तीन लाख रुपये लांबविले. पोलिस चौकी शोभेची म्हणून पुन्हा चर्चेत आली. 

असा घडला प्रकार..

मंगळवारी (ता. 25) बाजारच्या दिवशी सकाळी पावणे अकराच्या सुमारास सचिन चव्हाण एका प्लॅस्टिकच्या पिशवीत तीन लाख रुपये ठेवून सायकलीवरून बसस्थानकाजवळील बॅंक ऑफ बडोदामध्ये पैसे भरण्यासाठी आले. सायकलला अडकविलेल्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून चोरट्याने सुमारे तीन लाखांची रोकड लंपास केली. ही बाब लक्षात येताच त्यांनी शोधाशोध केली; पण चोरटा मिळून आला नाही. याबाबत पोलिसांनी शहरातील काही बॅंकांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. चव्हाण यांच्यावर पाळत ठेवणारे काही लोक फुटेजमध्ये दिसून आले. दिवसा झालेल्या या घटनेने ओझर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काही दिवसांत उपनगरात चोऱ्यांचे प्रमाण वाढलेले असताना, आता ओझरमधील पोलिस चौकीसमोरच चोरट्यांनी दिवसा मोठी रक्कम लंपास केल्याने ओझर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह उभे झाले आहे. याबाबत सचिन चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओझर पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Results Live : उत्तर पश्चिमची फेरमतमोजणी सुरु; वायकर यांच्या मागणीनुसार Recounting

Maharashtra Lok Sabha Election Winners Full List : महाराष्ट्राने भाकरी फिरवली! मविआचा महायुतीवर मोठा विजय; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी एका क्लिकवर

Dhule Constituency Lok Sabha Election Result : धुळ्यात भाजपच्या गडाला काँग्रेसचा सुरूंग! दोन वेळा खासदार राहिलेले भामरे पराभूत

Eknath Shinde: लोकसभा निवडणूकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे कमी पडले?

Akola Constituency Lok Sabha Election Result: नाराजीची चर्चा असतानाही अनुप धोत्रेंचा विजय; वंचित अन् काँग्रेसच्या संघर्षाचा झाला फायदा

SCROLL FOR NEXT