esakal | धक्कादायक! लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...
sakal

बोलून बातमी शोधा

Nashik-soldier-Wife-Murder.jpg

लष्करात जवान असलेला सुनील बावा मूळ नाशिकचा रहिवासी आहे. सुनील दहा दिवसांच्या सुट्टीवर घरी आला होता. यावेळी सुनील आणि त्याची पत्नी चैताली बावा यांच्यामध्ये काही कारणांवरुन कुरबुरी सुरु झाल्या. सुनील आणि चैताली यांच्यातील कुरबुरीचं पर्यवसान मोठ्या वादात झालं. त्यानंतर...

धक्कादायक! लष्करी जवानाकडून जेव्हा पत्नीची हत्या होते तेव्हा...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : लष्करी जवानाने पत्नीची हत्या करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना नाशकात उघडकीस आली आहे. घरगुती भांडणातून पतीने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे.

असा घडला धक्कादायक प्रकार...

लष्करात जवान असलेला सुनील बावा मूळ नाशिकचा रहिवासी आहे. सुनील दहा दिवसांच्या सुट्टीवर घरी आला होता. यावेळी सुनील आणि त्याची पत्नी चैताली बावा यांच्यामध्ये काही कारणांवरुन कुरबुरी सुरु झाल्या. सुनील आणि चैताली यांच्यातील कुरबुरीचं पर्यवसान मोठ्या वादात झालं. त्यानंतर सुनीलने पत्नी चैतालीची निर्घृण हत्या केल्याचा आरोप आहे. हत्येनंतर आरोपी सुनीलनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुनीलचा जीव वाचला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बावा दाम्पत्यामध्ये घरगुती वाद असल्याचं बोललं जात असलं, तरी हत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दहा दिवसांच्या सुट्टीवर असताना जवानाने पत्नीची हत्या केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. 
 

हेही वाचा > जेव्हा लॉजवर गणवेशधारी शाळकरी मुलामुलींची धांदल उडते....पोलिसही चक्रावले!

हेही वाचा > हृदयद्रावक! रक्ताच्या थारोळ्यात असूनही "माऊलीची" बाळाची घट्ट मिठी सुटली नव्हती...अखेर..

go to top