YCMOU Admission  esakal
नाशिक

YCMOU Admission : ‘मुक्‍त’च्‍या प्रवेशासाठी आता 20 पर्यंत मुदत

सकाळ वृत्तसेवा

YCMOU Admission : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठातर्फे प्रवेश अर्ज भरण्याच्‍या मुदतीत पुन्‍हा एकदा वाढ केली आहे.

शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्‍या प्रक्रियेत विनाविलंब शुल्‍कासह प्रवेशाचे अर्ज भरण्याची सुधारित मुदत २० सप्‍टेंबरपर्यंत असेल. (Deadline now till 20th september for ycmou admission nashik news)

राज्‍यभर विस्‍तार असलेल्‍या मुक्‍त विद्यापीठातर्फे सध्या प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. पदविका, पदवी आणि पदव्‍युत्तर पदवी अशा वेगवेगळ्या स्‍तरांवर शैक्षणिक पात्रतेनुसार विद्यार्थ्यांना दूरस्‍थ शिक्षण पद्धतीच्‍या माध्यमातून प्रवेश घेण्याची संधी उपलब्‍ध करून दिली आहे.

यापूर्वी वेळोवेळी मुदतवाढ देताना जास्‍तीत जास्‍त विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्याचा प्रयत्‍न विद्यापीठाने केला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नुकतीच वाढीव मुदत संपलेली असताना पुन्‍हा मुदतवाढीचा निर्णय विद्यापीठ अधिकार मंडळाने घेतला आहे.

या निर्णयानुसार कृषी आणि शिक्षणशास्त्र शाखेतील बी. एड. अभ्यासक्रम वगळता इतर सर्व अभ्यासक्रमांना विनाविलंब शुल्‍क प्रवेश अर्ज भरण्याची मुदत २० सप्‍टेंबरपर्यंत असेल. अर्ज भरलेल्‍या विद्यार्थ्यांना विभागीय केंद्राची मान्‍यता घेणे आवश्‍यक असते. त्‍यासाठी २३ सप्‍टेंबरपर्यंत मुदत असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lawyer Rakesh Kishor: मोठी बातमी! सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलावर कारवाई; बार कौन्सिलने घेतला मोठा निर्णय

By-elections in Seven States : बिहार निवडणुकीसोबतच सात राज्यातील आठ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा!

India ODI Squad: 'फक्त गंभीरच्या हो ला हो करा, भारतीय संघात निवड होईल', हर्षित राणाला संधी देण्यावरून दिग्गज क्रिकेटपटू भडकले

रॉक कच्छी-क्रेटेक्सची जोडी महाराष्ट्र गाजवणार! पुण्यात रंगणार ‘मराठी वाजलंच पाहिजे’ म्युझिक फेस्टिव्हल; पण कधी कुठे कोणती कार्यक्रम?

गवळण सादर करताना मराठी दिग्गज कोरियोग्राफर बरोबर घडलेला लज्जास्पद प्रकार; "मी त्याचवेळी.."

SCROLL FOR NEXT