Devidas Pingale inaugurating CCTV in Nashik Bazaar Committee.
Devidas Pingale inaugurating CCTV in Nashik Bazaar Committee. esakal
नाशिक

Nashik News : गुन्हेगारी रोखण्यासाठी सीसीटीव्ही उपयुक्त : देविदास पिंगळे

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिक बाजार समितीत आता तिसऱ्या डोळ्यांची नजर राहणार आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुख्य बाजार आवारात ६१ सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकार्पण करण्यात आले.

गुन्हेगारी व भुरट्या चोऱ्या अशा काही घटना घडू नये यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे उपयुक्त ठरणार आहे, असे माजी खासदार तथा बाजार समिती सभापती देविदास पिंगळे यांनी सांगितले. (Devidas Pingle statement CCTV useful to prevent crime nashik news)

या वेळी नाशिक बाजार समिती सभापती पिंगळे, उपसभापती सविता तुंगार, संचालिका निर्मला कड, संचालक संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, राजाराम धनवटे, तानाजी करंजकर, धनाजी पाटील, प्रल्हाद काकड, जगन्नाथ कटाळे, विनायक माळेकर, भास्करराव गावित, व्यापारी प्रतिनिधी संदीप पाटील, हमाल व मापारी प्रतिनिधी चंद्रकांत निकम, विलास कड, सचिव प्रकाश घोलप, अभियंता रामदास रहाडे, सहायक सचिव मनोज महाले, विजय निकम मोबीटेक सिस्टम कंपनीचे मुकेश बंब उपस्थित होते.

बाजार समिती आवारामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांच्या जाळ्या, दुचाकी , मोबाईल चोरी जाण्याचे प्रकार घडत होते. तसेच बाजार समितीत होणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीस पायबंद घालणे गरजेचे होते. शेतकरी, आडते, व्यापारी हमाल यांच्या सुरक्षेचा विचार करता सभापती पिंगळे व संचालक मंडळाने दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार आवार ६१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याप्रमाणे गुरुवारी (ता. ८) लोकार्पण करण्यात आले. शरदचंद्रजी मार्केट यार्ड, नाशिकरोड येथील उपबाजार असलेले सीसीटीव्ही कॅमेरे इंटरनेटद्वारे बाजार समितीच्या मुख्य कार्यालयात जोडण्यात आले आहे. शेतकरी अडते व व्यापारी यातील मध्यस्थी दूव्याचे काम बाजार समिती करत असते. बाजार समिती आवारात येणाऱ्या शेतकरी व व्यापारी हमाल यांच्यात काही वाद झाला.

आवारात संशयास्पद हालचाली दिसून आल्या तर, सीसीटीव्ही कंट्रोल रूममधील कर्मचारी संबंधित भागात असलेल्या सुरक्षारक्षक किंवा बाजार समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ सूचित करणार असल्याने बाजार समितीत येणाऱ्या प्रत्येक घटकासाठी सुरक्षेच्या दृष्टिने अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे बाजार समितीच्या संपूर्ण आवारावर तिसऱ्या डोळ्याचा अंकुश राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: बंगालमध्ये वाद पेटला, TMC-ISF समर्थकांमध्ये हाणामारी, भाजपचा आरोप- पराभवाच्या भीतीने हिंसाचार

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT