Nashik News : डॉक्‍टर, रुग्‍णांसाठी ‘ASI’ची पंचसूत्री : डॉ. प्रोबल नियोगी

शल्‍यचिकित्‍सा क्षेत्रात महिला डॉक्‍टरांची संख्या वाढत असून, त्‍यांना येणारी आव्‍हाने निश्‍चित करून ते सोडविण्यासाठी काम केले जाईल.
Presented at the state level conference 'Massicon 2024' organized by The Association of Surgeons of India and Nashik Surgical Society.
Presented at the state level conference 'Massicon 2024' organized by The Association of Surgeons of India and Nashik Surgical Society.esakal

Nashik News : शल्‍यचिकित्‍सा क्षेत्रात महिला डॉक्‍टरांची संख्या वाढत असून, त्‍यांना येणारी आव्‍हाने निश्‍चित करून ते सोडविण्यासाठी काम केले जाईल.

डॉक्‍टरांची सुरक्षितता, शस्‍त्रक्रिया अधिक प्रभावी करीत रुग्‍णांना दिलासा देण्याच्‍या अनुषंगाने असोसिएशन ऑफ सर्जन्‍स ऑफ इंडिया यांच्‍यातर्फे पंचसूत्री आखण्यात आल्‍याची माहिती ‘एएसआय’चे अध्यक्ष डॉ. प्रोबल नियोगी यांनी शनिवारी (ता. १०) दिली. (Dr Probal Neogi statement of Panchasutri of ASI for doctors patients nashik news)

त्र्यंबकेश्‍वर रोडवरील दि डेमोक्रेसी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्टस् ॲण्ड कव्हेंशन सेंटर येथे दि असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया आणि नाशिक सर्जिकल सोसायटी यांच्यातर्फे आयोजित ‘मॅसिकॉन २०२४’ राज्यस्तरीय परिषदेच्‍या औपचारिक उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते.

‘एएसआय’चे सचिव डॉ. प्रताप वरुटे, महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते, खजिनदार डॉ. नंदकिशोर कातोरे, परिषदेच्‍या आयोजन समितीचे सचिव डॉ. महेश मालू, मार्गदर्शक डॉ. प्रमोद शिंदे, अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, ‘एएसआय’चे डॉ. प्रताप विसपुते, उपाध्यक्ष डॉ. प्रवीण सूर्यवंशी, डॉ. अजय पिंपळे, डॉ. समीर रेगे, डॉ. अंजली दवळे, डॉ. हर्षद महात्‍मे आदी उपस्‍थित होते.

Presented at the state level conference 'Massicon 2024' organized by The Association of Surgeons of India and Nashik Surgical Society.
Nashik News: नांदूरशिंगोटे बसस्थानकाचे रुपडे पालटणार! नूतनीकरणासाठी 2 कोटी 11 लाख मंजूर

डॉ. नियोगी म्‍हणाले, की महाराष्ट्र शाखेतर्फे नियोजनबद्ध पद्धतीने परिषद आयोजित केली आहे. त्‍यामुळे देशभरातील इतर शाखांसाठी आदर्श निर्माण झाला आहे. डॉ. मालू म्‍हणाले, की गेल्‍या महिन्‍यापासून विविध समित्‍यांचे सदस्‍य परिषद यशस्‍वीतेसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत.

वैद्यकीय शिक्षणक्रमातील पदव्‍युत्तर पदवीच्‍या विद्यार्थ्यांपासून डॉक्‍टरांचा या परिषदेत चांगला सहभाग राहिला. पहिल्‍या दिवशी विविध विषयांवरील चर्चासत्रांमुळे वैद्यकीयचे विद्यार्थी, सहभागी डॉक्‍टरांच्‍या ज्ञानात भर पडली आहे. शस्‍त्रक्रियांच्‍या प्रात्यक्षिकांवर आधारित कार्यशाळा झाली. यात तज्‍ज्ञ डॉक्‍टरांनी शस्‍त्रक्रियेतील बारकावे समजावून सांगितले.

‘एएसआय’च्या महाराष्ट्र शाखेच्‍या ४६ व्‍या वार्षिक परिषद मॅसिकॉन २०२४ चा समारोप रविवारी (ता. ११) होणार आहे. परिषदेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन केले आहे. स्मरणिका व माहितीपत्र प्रकाशित करण्यात आले. उद्‌घाटन कार्यक्रमात डॉ. प्रमोद शिंदे यांनी डॉ. नियोगी यांचा परिचय करून दिला. डॉ. शिल्‍पा दयानंद व डॉ. नेहा आहेर यांनी सूत्रसंचालन केले.

Presented at the state level conference 'Massicon 2024' organized by The Association of Surgeons of India and Nashik Surgical Society.
Nashik News : तक्रार नाही, मात करायची : प्रतापराव पवार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com