Confusion during the meeting
Confusion during the meeting esakal
नाशिक

Nashik News: सावानाच्‍या वार्षिक सभेत गदारोळ! 2017 फेरमतमोजणीच्‍या मुद्द्यावरून वाद

प्रतीक जोशी

Nashik News : शहराच्या साहित्य संस्कृती आणि सामाजिक इतिहासाचा साक्षीदार असलेल्या सार्वजनिक वाचनालय नाशिकची रविवारी (ता. १९) मु. शं. औरंगाबादकर सभागृहात वार्षिक सर्वसाधरण सभा पार पडली.

मात्र, अध्यक्षांच्या भाषणातील २०१७ मधील फेरमतमोजणीच्‍या मुद्द्यावरून सभेत गदारोळ झाला. त्यांच्या विधानानंतर दोन्‍ही बाजूंनी वादविवाद निर्माण झाला. त्यानंतर मात्र अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांनी सभा संपल्‍याची घोषणा केली. (dispute at Savana Annual Meeting Discussion in meeting on various topics including installation of lift in library Nashik News)

सावानाचे अध्यक्ष प्रा. दिलीप फडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्‍या सर्वसाधारण सभेची सुरवात सुरळीतपणे झाली. मात्र उत्तरार्धात प्रा. फडके यांनी मिलिंद जहागीरदार यांचे पत्र वाचून दाखवताना २०१७ मधील फेरमतमोजणीचा विषय चर्चेला घेतला.

फेरमोजणीमुळे धनंजय बेळे यांना पराभव पत्‍कारावा लागला. तेव्‍हा निवडणूक निर्णय अधिकारीपदाची जबाबदारी सांभाळलेले दिवंगत माधवराव भणगे यांचे पुत्र सुहास भणगे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.

या वेळी सभासदांनी गोंधळ सुरू केल्‍यानंतर अध्यक्षांनी आपले शब्‍द मागे घेत असल्‍याचे जाहीर केले. परंतु त्‍यानंतर त्‍यांचे समर्थक आक्रमक झाल्‍याने सभा आटोपती घ्यावी लागली.

दरम्‍यान, सभेप्रसंगी इतिवृत्त वाचन, अहवाल वाचन, ताळेबंद तथा जमाखर्च, अंदाजपत्रकांचे वाचन ठराव मंजूर करण्यात आले. मात्र धर्मदाय आयुक्तांकडून मंजुरी मिळत नाही तोपर्यंत सभेतील विषय मंजूर करता येत नसल्याचे अध्यक्ष प्रा. फडके यांनी सांगितले.

वाचनालयाला विविध संस्था तसेच व्यक्तींच्या माध्यमातून लाख रुपयांची देणगी प्राप्त झाली. तसेच महाराष्ट्र शासनातर्फे यंदा वाढीव अनुदान सात कोटी ९२ लाखांचे अनुदान प्राप्त झाल्‍याची माहिती दिली.

बीपीसीएल कंपनीच्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून वाचनालयाला सोलर बसविण्यासाठी २० लाख रुपयांची मदत प्राप्त झाली आहे.

प्रा. दिलीप फडके यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. संजय करंजकर यांनी श्रद्धांजली यादीचे वाचन केले. अॅड. अभिजित बगदे यांनी इतिवृत्त वाचन केले.

डॉ. धर्माजी बोडके यांनी अहवाल सभासदांपुढे सादर केला. देवदत्त जोशी, गिरीश नातू यांनी ताळेबंद, जमाखर्च मांडला. गिरीश नातू यांनी अंदाजपत्रक सादर केले. जयेश बर्वे यांनी पत्र वाचन केले. डॉ. सुनील कुटे यांनी आभार मानले.

ग्रंथसंपदेत वाढ

या वर्षात पाच लाख ५८ हजार रुपयांच्या ग्रंथांची खरेदी केली असून, वाचनालयाची एकूण ग्रंथसंख्या एक लाख ९७ हजार यांसह संदर्भ विभागात पुस्तकांची संख्या ४३ हजार इतकी आहे.

वाचनालयाच्या बालविभागत ५७५ विद्यार्थी सभासद आहेत. २५ वर्ष वयापर्यंत विद्यार्थ्यांना मोफत ग्रंथ वाचनास उपलब्ध केले जाणार असल्‍याची माहिती उपाध्यक्ष डॉ. सुनील कुटे यांनी दिली.

अन्‍य विविध विषयांवर चर्चा

शहरातील प्रत्येक वाचकापर्यंत वाचनालयातील ग्रंथसंपदा पोचावी यासाठी ‘लायब्ररी ऑन व्हील’ उपक्रम महत्त्वाचा आहे. यासाठी दोन लाख रुपयांची तरतूद करून डिसेंबरअखेरपर्यंत ही गाडी रस्त्यावर येऊन नागरिकांपर्यंत ग्रंथ पोचवेल, अशी माहिती अध्यक्ष प्रा. फडके यांनी दिली.

परशुराम साईखेडकर नाट्यगृहाच्‍या नूतनीकरणासाठी अंदाजे साडेतीन कोटींचा खर्च लागणार आहे. वाचनालयाच्या सभासदसंख्या, वाचनसंख्या, ग्रंथसंख्या व विविध उपक्रमांत वृद्धी झाल्याने सभासदांनी अभिनंदनाचा ठराव एकमताने मंजूर केला.

ज्‍येष्ठ नागरिकांसाठी वाचनालयात पोचण्यासाठी लिफ्टची व्यवस्था व्हावी, लायब्ररी ऑन व्हील लवकर सुरू व्हावी, या प्रमुख मागण्या सभासदांनी मांडल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT