artists making mahalakshami idols esakal
नाशिक

Diwali Festival 2022 : लक्ष्मी मूर्ती रंगरंगोटी कामात कलाकार दंग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : दिवाळी आठ दिवसावर येऊन ठेपली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी लागणारी लक्ष्मीची मूर्तीला ग्राहकांची विशेष मागणी आहे. उन्हाळ्यात लक्ष्मीच्या मूर्ती तयार केल्‍या जातात, यानंतर त्‍यांचे रंगरंगोटीचे कामे साधारण दिवाळीच्या १ महिना अगोदरपासून सुरू होते. अलीकडच्या काळात ग्राहकांची लक्ष्मीपूजनासाठी मूर्तीला मागणी वाढली असल्‍याने मूर्ती कलाकारांचे काम त्‍या अनुषंगाने सुरू आहे. (Diwali Festival 2022 Lakshmi idol Making by Artist nashik Latest Marathi News)

पारंपारिक व्यवसाय असलेले मंडळी लक्ष्मी मूर्तीच्या रंगरंगोटीच्या कामात दंग आहेत. लक्ष्मीची एक मूर्ती रंग कामासाठी निदान १५ ते २० वेळेस हाताळावी लागते, कारण यात देवीच्या साडीचा रंग वाळल्‍यावर ब्‍लाऊजला रंग दिला जातो. मग दागिने याप्रमाणे रंगरंगोटीची काम केले जाते. अतिशय बारीक व किचकट काम आहे. तसेच रंगकाम करताना बैठक व एकाग्रता आवश्‍यक असते. सद्यःस्थितीत मूर्तीला रंग देण्याचे काम सुरू आहे. तसेच ३ इंचापासून ते दीड फुटापर्यंत मुर्ती बनविल्‍या जातात. ग्राहकांच्या मागणीनुसार मूर्ती बनविल्‍या जात आहेत. तसेच साधारण ९ इंच व ११ इंच आकारातील मूर्तींना बाजारात जास्‍त मागणी आहे.

मूर्तींचे दर आकारानुसार

५० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत आहेत.
९ इंच ते ११ इंच मूर्ती ३०० रुपयांपासून ते ३५०, ४०० रुपयांपर्यंत आहेत.
लक्ष्मीच्या मूर्ती या कमळावर बैठक स्‍वरूपात, तर धनाच्या राशीवर बैठक स्‍वरूपातील मूर्ती अतिशय आकर्षक आहेत.

मूर्तीसाठी लागणारे रंग

स्‍कीन पाणी रंग वा वॉटर कलर
ॲक्रेलिक कलर
नेलपेंट कलर

या विविध रंग एकत्र करून रंगसंगतीने लक्ष्मीच्या साड्यांचे आकर्षक कलर तयार केले जातात. तसेच, दागिने व श्रृंगारात ॲक्रेलिक तसेच नेलपेंट कलरचा विशेष उपयोग केला जातो.

"हा आमचा पारंपारिक व्यवसाय असून, सध्या चौथी पिढीही हा व्यवसाय मोठया उत्‍साहाने करत आहे. सध्या माझे वय ६५ च्‍या दरम्‍यान आहे. मूर्तीला प्राथमिक रंग देण्याचे काम मी स्वतः करतो. माझे मुलेही मोठया उत्‍साहाने व्यवसाय सांभाळत आहेत." - मोरे बंधू, व्यावसायिक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trumpet Symbol: शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिलासा! 'तुतारी'बाबत निवडणूक आयोगानं दिला मोठा निर्णय

Pune Politics : बंडखोर नक्की कोणाचा करणार गेम? माघारीसाठी सर्वच पक्षाचे नेते लागले कामाला!

Shrinivas Vanaga: "षडयंत्र रचून माझं तिकीट कापलं"; अज्ञातवासातून घरी परतेलल्या श्रीनिवास वानगांचा गंभीर आरोप

रणबीरमुळे Anushka Sharma ने ‘तमाशा’ चित्रपट सोडला, म्हणाली - हा चित्रपट नाकारला कारण...

घराघरात टीव्ही पोहोचवण्याचं स्वप्न बघणारे BPLचे फाऊंडर टी.पी. गोपालन नांबियार यांचं निधन

SCROLL FOR NEXT