NMC News
NMC News esakal
नाशिक

NMC News : थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल; सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी कर वसुली

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : वारंवार नोटीस बजावूनही थकबाकी न भरणाऱ्या मालमत्ता धारकांच्या घरासमोर ढोल वाजवण्यास सुरवात झाल्यानंतर अखेरीस थकबाकी भरण्यास सुरवात झाली आहे. पहिल्या दिवशी ७४ लाख रुपये वसूल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळून एक कोटी दहा लाख रुपयांची थकबाकी महापालिकेच्या तिजोरीत जमा झाली. (Drums in Front of Home of Arrears Record tax collection for second day in row Nashik NMC News)

महापालिकेच्या विविध कर विभागाकडून थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यात आली आहे. थकबाकी वसुली मोहीम सुरू करण्यापूर्वी महापालिकेने १२५८ थकबाकीदारांची यादी संकेतस्थळावर जाहीर केले. त्यानंतर नोटीस बजावल्या. नोटीस दिल्यानंतर प्रामाणिकपणे कर भरतील, अशी अपेक्षा होती. मात्र, एकही थकबाकीदार पुढे आला नाही. अखेरीस महापालिकेने थकबाकीदारांच्या घरासमोर ढोल बडवण्यास सुरवात केली आहे.

जोपर्यंत थकबाकी अदा करत नाही, तोपर्यंत ढोल वाजवण्याची मोहीम सुरू राहणार आहे. परिणामी बोभाटा होण्याच्या भीतीने थकबाकीदारांकडून रोख स्वरूपात, तर काही थकबाकीदारांकडून धनादेशाच्या स्वरूपात थकबाकी अदा केली जात आहे. पहिल्याच दिवशी ७४ लाख रुपयांची थकबाकी जमा झाली. दुसऱ्या दिवशी ७३ ठिकाणी ढोल वाजविण्यात आले, तेथून १ कोटी ९ लाख ६६ हजार ३३५ रुपयांची कर वसुली झाली आहे. पश्चिम विभागात सर्वाधिक ६२ लाख ७६ हजारांची वसुली झाली. सिडको विभागात २१ लाख ९४ हजार ४१६ रुपये वसुली झाली आहे. सहा विभाग मिळून एकूण ७४ ठिकाणी ढोल वाजविण्यात आले.

विभागनिहाय कर वसुली

नाशिक पूर्व - ४,८५,००० रुपये

नाशिक पश्चिम - ६२,७६,००० रुपये

पंचवटी - १५,०५,५९० रुपये

नाशिक रोड- १,५२,००० रुपये

नवीन नाशिक- २१,९४,४१६ रुपये

सातपूर - ३,५३,३२९ रुपये

एकूण - १ कोटी ९ लाख ६६ हजार ३३५ रुपये

एक लाख थकबाकी असलेले १२५८ थकबाकीदार

एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेले एकूण १२५८ थकबाकीदार आहेत. त्यांची नावे नाशिक महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहेत. सुटीचे दिवस वगळता एकूण १९ दिवस ही मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती कर विभागाने दिली आहे. घर आणि पाणीपट्टीची थकबाकी भरावी, तसेच चालू वर्षीचा कर भरून नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. जे कर भरणार नाहीत. त्यांच्या घरासमोर, आस्थापनांसमोर ढोल वाजविणार आहे. वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होईपर्यंत ही मोहीम सुरूच राहणार असल्याची माहिती कर विभागाच्या उपायुक्त अर्चना तांबे यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Economy: 2075मध्ये चीन पहिल्या क्रमांकावर तर अमेरिका सर्वात श्रीमंत असेल, भारत कुठे असणार?

Latest Marathi News Live Update : काँग्रेसला सीएएबद्दल खोटे बोलून दंगल घडवायची होती', पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्ला

Alia Bhatt: विराट अन् प्रियांकानंतर आता आलियाचा नंबर, ब्लॉकआऊट लिस्टमध्ये नाव सामील, पण ही यादी कसली?

Flight Ticket Price : दुबईपेक्षा देशांतर्गत विमान प्रवास महाग; ५० ते ६० टक्के भाडेवाढ, पर्यटकांना उन्हाळ्यात दरवाढीचे चटके

Singapore Air Forceच्या कर्मचाऱ्याचा प्रताप, महिलांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक करून... वाचा या प्रकरणातील भारतीय कनेक्शन

SCROLL FOR NEXT