nashik crime news
nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : पत्नीचा खून करून मद्यपी पतीची आत्हमत्या

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : अंतापूर (ता.बागलाण) येथे मद्यपी पतीने पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालत खून केला. पत्नीच्या खुनानंतर फरार झालेल्या पतीने गळफास घेत आत्महत्या केली. या बाबत जायखेडा पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Drunken husband commits suicide after killing his wife Nashik Crime News)

अंतापूर जवळील मळगावपाडे शिवारातील शेतात मजुरीनिमित्त संजय काळू पवार (वय ३२), साळूबाई पवार (वय २७) तीन मुलांसह राहत होते. काल (ता.१५) पती- पत्नीत वाद झाला. मद्यपी संजय याने नशेत कुऱ्हाडीने पत्नी साळूबाईच्या डोक्यात घाव घातला.

त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय पोलिस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, जायखेडा पोलिस ठाण्याचे अधिकारी पुरुषोत्तम शिरसाठ, उपनिरीक्षक संजय वाघमारे, हवालदार सुनील पाटील, गोपीनाथ भोये, पोलिस नाईक योगेश क्षीरसागर, तुषार मोरे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घाव घातलेली कुऱ्हाड तशीच डोक्यात खोल अडकल्याने कुऱ्हाडीसह साळूबाईचा मृतदेह नामपूर ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. पत्नीचा खून करून फरार झालेला संजय यानेही भितीपोटी जामोटी येथील मुळगाव जवळील रस्त्यालगत पळसाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याचे मंगळवारी (ता.१६) सकाळी लक्षात आले.

वरिष्ठ अधिकारी व पोलिस कर्मचारी यांनी पवार याचा मृतदेह नामपूर येथे विच्छेदनासाठी पाठवला. दोघांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. मृतांच्या पाठीमागे आई-वडील व तीन लहान मुलं आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT