Fayyaz Mulani New District Deputy Commissioner nashik
Fayyaz Mulani New District Deputy Commissioner nashik esakal
नाशिक

Nashik News : फय्याज मुलानी नवे जिल्हा उपनिंबधक

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तत्कालीन जिल्हा उपनिबंधक सतीश खरे लाच घेतल्याप्रकरणी निलंबित झाल्यानंतर रिक्त जागी नाशिक तालुका उपनिबंधक पदाची धुरा सांभाळत असलेले फय्याज मुलानी यांची पदोन्नतीने बदली झाली आहे.

मुलानी आता नवीन जिल्हा उपनिबंधक झाले असून सोमवारी (ता.२९) ते पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. (Fayyaz Mulani New District Deputy Commissioner nashik news)

तत्कालीन जिल्हा उपनिबंधक खरे यांना १५ मेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केल्यानंतर तात्काळ त्यांचा पदभार काढून घेतला होता. तत्पूर्वी विभागीय सहनिबंधक विभागाने खरे यांच्याबाबतचा तोंडी अहवाल सहकार विभागास कळविला होता.

खरे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर झाल्यानंतर त्यांना १७ मेस निलंबित करण्यात आले.

तात्पुरता पदभार सहनिबंधक सहकारी संस्था (आदिवासी विकास) चे एस. वाय. पुरी यांच्याकडे सोपविला होता. अखेर काल (ता.२६) मुलानी यांची जिल्हा उपनिबंधकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ते २०१९ मध्ये नाशिक तालुका उपनिबंधकपदावर कार्यरत होते. तत्पूर्वी त्यांनी पुणे उपनिबंधक म्हणून काम करण्याचा अनुभव आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

तालुका उपनिंबधक असताना त्यांच्याकडे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासकाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. या कार्यकाळात त्यांनी बाजार समितीचे एक कोटी रूपयांची बचत करत, उत्पन्नात मोठी वाढ केली होती. नाशिक तालुक्यातील हौसिंग सोसाटयांचे पुर्नजिवित करण्याचे काम देखील त्यांनी केले.

खरेंची विभागांतर्गत चौकशी सुरू

सतीश खरे यांना निलंबित केल्यानंतर, त्यांची सहकार विभागाकडून चौकशी सुरू झाली आहे. खरे यांना लाच घेतल्याप्रकरणी त्यांच्यावर लावण्यात आलेल्या दोषारोपाबाबत सहकार विभागाचे प्रादेशिक अधिकारी सु. सा. जाधव यांच्याकडून चौकशी सुरू आहे.

यासाठी त्यांनी केलेल्या कामकाज, त्यांची कागदपत्रे याची तपासणी सुरू आहे. साधारण महिनाअखेर ही चौकशी पूर्ण होऊन चौकशी अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: "सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

Mumbai Traffic advisory : मुंबईत PM नरेंद्र मोदींची जाहीर सभा; गर्दी टाळण्यासाठी वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Dahi Poha Recipe: सकाळच्या नाश्त्यात दही पोह्याचा घ्या आस्वाद ,जाणून घ्या रेसिपी

IPL 2024 MI vs LSG : शेवट गोड करण्याचे लक्ष्य; मुंबई - लखनौमध्ये आज लढत; रोहितला फॉर्म गवसणार?

बारावीचा 21 किंवा 22 मे रोजी तर दहावीचा निकाल 30 मेपूर्वी! ‘या’ संकेतस्थळांवर पाहता येईल निकाल; जुलैमध्ये अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा

SCROLL FOR NEXT