ZP Nashik latest marathi news esakal
नाशिक

Nashik ZP Funding: आरोग्य कर्मचारी हजेरी यंत्रणेसाठी जि.प. सेसमधून 9 लाख

मोबाईल सेल्फीव्दारे आरोग्य कर्मचाऱ्यांची हजेरी प्रस्तावास मंजुरी

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP Funding : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे कर्मचारी, अधिकारी उपस्थित राहात नसल्याचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर, हजेरीसाठी थेट कर्मचाऱ्यांच्या मोबाईलमध्ये सॉफ्टवेअर टाकत मोबाईल सेल्फीद्वारे हजेरी घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता.

त्यासाठी लागणाऱ्या सॉफ्टवेअर खरेदीस मान्यता मिळाली असून सेसमधून ९ लाख रुपये खर्चास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे लवकरच ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. (For health worker attendance system in ZP 9 lakh from cess Funding Nashik News)

ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र येथे कर्मचारी, अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीत कर्मचारीही हजर नसल्याचे दिसून आल्याने कर्मचारी उपस्थितीचा मुद्दा ऐरणीवर आला होता.

त्यावेळी बायोमेट्रीक मशिन बसविलेले असताना देखील, कर्मचारी हजर नसल्याने हजेरीसाठी मोबाईल सेल्फीव्दारे हजेरी घेण्यासाठी लागणारे सॉफ्टवेअर खरेदीचा प्रस्ताव आरोग्य विभागाने सादर झाला होता.

सदर प्रस्तावानुसार, जिल्ह्यातील ११२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील कर्मचाऱ्यांना सदर हजेरी सक्तीची केली जाणार आहे. यात हजेरीसह फोटो अपडेशन, लाइव्ह लोकेशन आणि जिओ टॅगिंग या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला जाणार आहे.

त्यामुळे आरोग्य केंद्रातील कर्मचारी नेमका कुठे आहे, याबाबत यंत्रणेला तत्काळ कळण्यास मदत होणार होती. या प्रकारानंतर, मोबाईलद्वारे सेल्फी हजेरी यंत्रणा बसविण्याचा आरोग्य विभागाने प्रस्ताव तयार करत सादर केला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सादर झालेल्या या प्रस्तावात अनेक त्रुटी काढण्यात आल्या होत्या. या यंत्रणेस निधी कोठून आणायचा हा प्रश्न उभा राहिला होता. निधी नसल्याने, या यंत्रणेस निधीसाठी प्रशासनाला साकडे घालण्यात आले होते.

प्रशासनाने आरोग्य विभागास ९ लाख रुपयांचा निधी देण्यास मंजुरी दिल्यानंतर आरोग्य विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. यातून साडेसहा लाख वनटाईम खर्च केला जाणार असून जीएसटी व इतर खर्चासाठी २.५० लाख खर्च अपेक्षित आहे.

या यंत्रणेस देखभाल दुरुस्तीसाठी तीन हजार रुपये महिन्याला लागणार आहे. यंत्रणा खरेदी करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर संबंधित पुरवठादारास आदेश देण्यात आली असून, ही यंत्रणा कार्यान्वित केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शिवसेनेच्या नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार, शिंदेंच्याच पदाधिकाऱ्याची हायकोर्टात याचिका

Chandoli Koyna Tiger Territory : चांदोली, कोयना जंगलात वाघांनी हद्दी केल्या फिक्स, तीन वाघांमध्ये कोणाची दादागिरी

Latest Marathi news Live Update : "भारतातील मुस्लिम पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित आहेत"- एआययूडीएफचे प्रमुख बद्रुद्दीन अजमल

Crime News : थरार केरळमधील शोधमोहिमेचा! बोईसरच्या चिमुकल्याला पोलिसांनी मृत्यूच्या दाढेतून नाही, तर पित्याच्या विळख्यातून सोडवले

Republic Day Weekend 2026: प्रजासत्ताक दिनी मुलांसोबत आउटिंगचा प्लॅन? पुण्यातील ‘या’ ठिकाणांना नक्की द्या भेट

SCROLL FOR NEXT