Four wheeler stuck at godaghat due to water level nashik news
Four wheeler stuck at godaghat due to water level nashik news esakal
नाशिक

Nashik News : गोदाघाटावर अडकली चारचाकी वाहने; अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी व जीवरक्षक दल धावले मदतीला

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गंगापूर धरणातून जायकवाडी साठी सोडण्यात आलेल्या पाण्याने वाहनतळावर चारचाकी वाहने अडकल्याच्या घटना घडल्या. अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी तसेच जीवरक्षक दलाच्या युवकांनी ही वाहने सुखरूप बाहेर काढण्यास मदत केली.

पाण्याची पातळी वाढणार असल्याच्या सूचना महापालिका प्रशासनाने शनिवारी दिल्या असल्याचे सांगितले जात असले तरी अशा सूचना दिल्या गेल्या नसल्याचे नागरिक सांगत आहेत.(Four wheeler stuck at godaghat due to water level nashik news)

धरणातून पाणी सोडण्यात आल्याने रविवारी दुपारी पाण्याची पातळी वाढली. पाणी म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, खंडोबा पटांगण व रोकडोबा मैदानावरून वाहू लागल्याने या ठिकाणच्या वाहन तळावर पार्क केलेली वाहने पाण्यात अडकले.

ही वाहने रामकुंडावर धार्मिक विधी करण्यासाठी आलेल्या भाविकांची तसेच बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांची होती. वाहने पार्क करताना त्यांना कोणत्याही प्रकारच्या सूचना दिल्या गेल्या नसल्याने त्यांची वाहने अडकली असल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, प्रशासनाने रात्रीच परिसरातील व्यवसायिकांना सूचना देऊन टपऱ्या काढून घेण्यास सांगितले होते. वाहने पार्क करू नये हे देखील सांगण्यात आले असले तरी सकाळी तसे सांगण्यासाठी कुणी नसल्याने भाविक व पर्यटक वाहने पार्क करून गेले असता ती पाण्यात अडकली.

पाण्याची पातळी मर्यादित असल्याने वाहने वाहून जाण्याची शक्यता नसली तरी ती बाहेर काढणे अवघड होतं असल्याने अग्निशामक दलाची मदत घेऊन वाहने सुखरूप बाहेर काढण्यात आली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT