Ganesh idols
Ganesh idols Sakal
नाशिक

गणेशमूर्तींनी बाजारपेठ सजली…

युनूस शेख

जुने नाशिक : अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला आहे. शहरात विविध भागात गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल सजले आहे. कोरोना निर्बंध आणि शाडू मूर्ती स्थापन करण्याच्या प्रशासनाच्या सूचनेमुळे गणेशमूर्ती बुकिंगवर काहीसा परिणाम झाला आहे. २० सप्टेंबरला सर्वत्र गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने शहराच्या विविध भागातील बाजारांमध्ये आकर्षक गणेशमूर्ती विक्रीचे स्टॉल लागले आहे.

चार फुटापर्यंत गणेशमूर्ती स्थापना करण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एक फुटापासून ते चार फुटापर्यंत गणेशमूर्ती स्टॉलवर उपलब्ध आहे. एक ते पाच हजारांपर्यंत मूर्ती विक्रीस उपलब्ध आहे. गेल्यावर्षी तुलनेत यंदा गणेश उत्सव साजरा करण्यासंदर्भात काहीसे मोकळीक असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे, निर्बंध मात्र कायम आहे. कुठल्याही प्रकारे गर्दी होणार नाही, यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नागरिकांची काहीशी द्विधा मनःस्थिती असल्याने अद्याप त्यांचे पाऊल गणेशमूर्ती बुकिंगकडे वळले नाही. दरवर्षी यावेळेपर्यंत ६० ते ७० टक्के बुकिंग होते. यंदा २० ते ३० टक्के बुकिंग झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले आहे. प्रदूषण टाळण्यासाठी शाडू मूर्ती स्थापना करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे. त्याचादेखील परिणाम बुकिंगवर झाला आहे. शेवटच्या दहा दिवसांमध्ये परिस्थिती अनुरूप खरेदी- विक्री आणि बुकिंग वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

मूर्ती बनवून घेण्यावर भर

गणेशमूर्ती खरेदीसाठी बाजारात होणारी गर्दी टाळण्यासाठी यंदा बहुतांशी नागरिकांनी तयार मूर्ती घेण्यापेक्षा शाडू मातीची मूर्ती बनवून घेण्यावर अधिक भर दिला आहे. परंतु, शाडू माती महाग पडत असल्याने मूर्ती तयार करून देणे परवडत नसल्याचे मूर्तिकारांनी सांगितले.

कोरोना निर्बंध आणि शाडू मातीच्या मूर्ती स्थापना करण्याच्या प्रशासनाच्या सूचना यांचा परिणाम यंदा गणेशमूर्ती खरेदी- विक्री व बुकिंगवर झाला आहे.

- महेश खोले, मूर्तिकार.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT