Minister Health MP Dr. Bharti Pawar esakal
नाशिक

Dr Bharti Pawar : 'एनसीसीएफ'कडील कांद्याला 350 प्रतिक्विंटल अनुदान द्या; डॉ. पवार यांनी वेधले लक्ष

सकाळ वृत्तसेवा

Dr Bharti Pawar : राज्यात खरेदी दरम्यान लेट खरीप कांद्याला अपेक्षित दर नसल्याची बाब विचारात घेऊन कांद्याला अनुदान देण्याबबत निर्णय घेण्यात आला.

यात या पात्र लाभार्थ्यांच्या प्रस्तावामध्ये 'एनसीसीएफ'चा उल्लेख नसल्याची बाब केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी गांभीर्याने घेतली आहे. (Give subsidy dr bharti pawar demand to give of 350 per quintal to onion from NCCF nashik news)

याप्रश्नी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले असून 'एनसीसीएफ'कडे ज्यांनी कांदा विकला आहे, त्या शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान द्या अशी मागणी केली आहे.

पणन विभागाने काढलेल्या निर्णयानसार राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार, थेट पणन अनुज्ञप्ती धारक व नाफेड खरेदी केंद्राकडे 1 फेब्रुवारी ते ३१ मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना ३५० रूपये प्रतीक्विंटल अनुदान देखील निश्चित करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

या शासन निर्णयानुसार नाफेड केंद्राकडे कांदा विक्री केलेले शेतकरी अनुदानास पात्र ठरले.मात्र शासननिर्णयात 'एनसीसीएफ'ने कांदा खरेदी केलेला असतानाही उल्लेख करण्यात आलेला नाही.

त्यामुळे 'एनसीसीएफ'कडे कांदा विकणारे शेतकरी अनुदानापासून वंचित राहिल्याची बाब पत्रात मांडली आहे. पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत शासन निर्णयात अंशत: बदल करून एनसीसीएफ कडे कांदा विक्री केलेल्या शेतक-यांना देखील अनुदान मिळावे याबाबत मुख्यमंत्र्यांनी कार्यवाही करावी,अशी विनंती पत्राद्वारे केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karnataka Monsoon Update : राज्यात आजपासून मुसळधार पावसाचा इशारा; 11 जिल्ह्यांना यलो अलर्ट, चार जूनला मॉन्सून केरळात होणार दाखल

Cycling Story: ६० वर्षांपासून रोज सायकल चालवणारे पांडुरंग शिर्के; सहा वेळा सायकलवरून पंढरपूर वारी, आजही विनाऔषध तंदुरुस्त

Latest Marathi News Live Update : कुंभमेळ्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला संजय राऊतांची भेट; समाधानकारक मोबदला देण्याची मागणी

Delhi Fire इमारतीत आग, बाहेरून कुलूप; २१ जण जिवंत होरपळले; उपचारासाठी आलेल्या परदेशी नागरिकांचाही मृत्यू

Mahayuti 17 MLC Candidates : विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर; सर्व जागांवर विजयाचा दावा

SCROLL FOR NEXT