A household member in a wheat field conducted by highly educated farmer Gokul Jadhav with modern experiments.
A household member in a wheat field conducted by highly educated farmer Gokul Jadhav with modern experiments. esakal
नाशिक

Nashik Agricultural Success : शेतीला पंढरी अन्‌ कष्टाला भक्ती समजणाऱ्या शेणीतच्या उच्च शिक्षित शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग!

विजय पगारे

इगतपुरी : तालुक्यात रब्बी हंगामात शेतकरी लोकवन, अजय ७२, अजित १०२ गव्हाचे पीक घेतात. त्यातून उत्पन्न कमी मिळते. मात्र, शेणीत येथील पदवीधर असलेले शेतकरी गोकुळ जाधव यांनी १५ एकरांमध्ये संकरित जातीचा गहू केला आहे. तालुक्यात त्यांनी हा पहिलाच प्रयोग केला आहे. (Gokul Jadhav graduate farmer from Shenit grown hybrid wheat in 15 acres agriculture success nashik)

शेतीत त्यांना वडील प्रकाश जाधव, त्यांची आई नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका लता जाधव, भाऊ कॅनडा बँकेचे व्यवस्थापक प्रवीण जाधव, पत्नी अर्चना जाधव यांची मदत होते.

कृषी विद्यापीठात उच्च शिक्षण घेऊनही आपल्या मातीशी एकरूप असलेल्या तरुणाने शेतात अनेक नवनवीन उपक्रम केले आहेत. त्याची दखल कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापनाने (आत्मा) घेऊन नुकताच आदर्श शेतकरी पुरस्कार जाहीर केला आहे.

गोकुळ जाधव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. दाणेदार गव्हाचे फुटवे सिंगल पेरणीतून केले असून, गव्हाचे पीक ११० दिवसांत येते. त्यासाठी त्यांनी एकरी २० किलो बियाणे वापरले आहे.

योग्य खतांचे नियोजन व फवारणी करून गव्हाचे दोन फूट फुटवे झाले आहेत. फुटव्यांमधील अंतर नऊ इंच ठेवले आहे. हा आधुनिक गव्हाचा प्रयोग निफाड व सिन्नरमध्ये केला जातो, तो आता इगतपुरी तालुक्यात श्री. जाधव यांनी केल्याने काही शेतकऱ्यांनी या शेतीला भेटी दिल्या आहेत.

या गव्हाला १५ दिवसांनी पाणी देतात. तालुक्यात घरगुती बियाणे वापरून गव्हाची पेरणी करतात. त्यात उत्पन्न १५ क्विंटल मिळते. मात्र, संकरित गव्हाच्या प्रयोगातून एकरी ३० क्विंटल उत्पन्न मिळते.

एक महिन्यात पीक निघणार असून, या नवीन प्रयोगातून १० ते १२ लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचे गोकुळ जाधव यांनी सांगितले. हा गहू खराब होण्याची भीती नसून साठवणूक करून ठेऊ शकतो.

शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीला भेट द्या, असे आवाहन जाधव यांनी केले. या कुटुंबांला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना प्रा. तुषार उगले, इगतपुरी तालुका कृषी विभागाकडून शेतीचे मार्गदर्शन मिळते.

शेतात नवनवीन प्रयोग

गोकुळ जाधव यांनी नोकरीवर अवलंबून न राहता आपल्या शेतात अनेक नवनवीन उपक्रम केले आहेत.

त्यात दहा एकरात टोकन पद्धतीने सोयाबीन पिकाची यशस्वी लागवड, सहा वर्षांपासून शेडनेटच्या माध्यमातून ढोबळी, पॉलिहाऊसमध्ये रंगीत ढोबळी मिरचीचा प्रयोग केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : ''मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांची नावं लिहून घ्या, त्यांची नावं जाहीर करुन कोर्टात धाव घेणार'', उद्धव ठाकरेंनी का दिला इशारा?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: 'आप'शी पंगा घेतल्यानंतर स्वाती मालीवालांना गमवावं लागणार राज्यसभा सदस्यत्व? काय सांगतो नियम

Crime News: 200 सीसीटीव्हींची पडताळणी अन् दातांचे निशाण! पोलिसांनी असा शोधून काढला बलात्काराचा आरोपी

Sahara Group: सहारा समूहाने 'स्कॅम 2010' वेब सीरिजवर कायदेशीर कारवाईची दिली धमकी; काय आहे कारण?

Kalyan Lok Sabha : 'मतदान केलं नाही तर पगार कापला जाणार..'; मतदार यादीत नावच सापडत नसल्याने मतदार रडकुंडीला!

SCROLL FOR NEXT