नाशिक

Nashik Fire Accident: पेठरोडला मोकळ्या मैदानातील गवतास आग

सकाळ वृत्तसेवा

Nashik Fire Accident: पेठ रोडवरील मेहेर धाम येथील शिवतेज नगर मधील एस टी इंजिन वर्कशॉप पाठी मागे असलेल्या गवताच्या मैदानात अचानक आग लागली.

काही नागरिकांनी अग्निशामक दलाला तात्काळ संपर्क केल्याने वेळेत आग विझविण्यात यश आले. यामुळे होणारी मोठी हानी टळली आहे. (Grass in open field caught fire in peth road Nashik Fire Accident)

पेठ रोडवर एस टी इंजिन वर्क शॉपच्या पाठीमागे गवताला अचानक आग लागली. याबाबत माहिती मिळताच पंचवटी अग्निशामक केंद्रावरील एक बंब तात्काळ घटनास्थळी पोहचला आणि आग विझविण्यास सुरुवात केली. मात्र एस टी इंजिन वर्क शॉपच्या बाजूने मोठ्या प्रमाणत आग वाढत चालल्याने घटनास्थळी आणखी दोन बंब बोलाविण्यात आले.

एका बंबने वर्क शॉपच्या बाजूस असलेल्या रो हाऊस, घराकडे येणारी आग आटोक्यात आणली. तर दुसऱ्या बंबाने इंजिन वर्क शॉपच्या टायर व ऑईल डेपोकडे वाढत जाणारी आग आटोक्यात आणण्यात आली.

घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पंचवटी केंद्राचे दोन बंब व पंचवटी विभागीय अग्निशमन केंद्राचा एक बाऊजर (बंब) तात्काळ दाखल झाल्याने अग्निशामक दलास वेळेत आग विझविण्यात यश आले. यामुळे होणारी मोठी हानी टळली.

अग्निशामक दलाचे लिडिंग फायरमॅन संजय कानडे, फायरमॅन मंगेश पिंपळे, नितीन म्हस्के, श्रीकांत नागपुरे, राजू पाटील, वाहन चालक अशोक सरोदे, रविंद्र काठे, कांतीलाल कवर, बाळासाहेब लहांगे, ट्रेनी फायरमॅन निलकंठ शिंदे, मेहुल उगले, संकेत वैष्णव व कार्तिक महाले हे उपस्थित होते. या उत्कृष्ट कामगिरीसाठी मनपा आयुक्त, मुख्य अग्निशमन अधिकारी, माजी महापौर रंजना भानसी , एसटी डेपोचे अधिकारी पटेल सर यांनी आग आटोक्यात आणली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT