Arrest News
Arrest News esakal
नाशिक

Nashik Crime News : नवरदेव बोहोल्यावरून थेट पोलिस ठाण्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : महिलेवर सलग चार वर्षे अत्याचार करून तिला फसवून दुसऱ्या तरुणीशी लग्न करणाऱ्या तरुणाची वरात थेट पोलिस ठाण्यात नेण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. (groom arrested straight to police station for wedding Nashik Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित पंकज शरद कदम (रा. देवळाली गाव, नाशिक रोड) याने पीडित महिलेच्या ओळखीचा फायदा घेऊन ४ एप्रिल २०१९ ते १८ मे २०२३ या कालावधीत तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र यादरम्यान पंकज कदम याचा राहाता येथील उच्चशिक्षित मुलीशी विवाह ठरला होता. रविवारी (ता. २१ ) नवरदेव वऱ्हाडी मंडळींसह राहाता येथे दाखल झाले होते. विवाह सोहळ्याची तयारीही झाली होती. डीजेच्या तालावर नवरदेवाची मिरवणूकही निघाली. यादरम्यान, फिर्यादी पीडित महिलेने लग्नस्थळी दाखल होत आमचे प्रेमसंबंध असून, लग्नाचे आमिष दाखवून पंकज कदम याने अनेकदा अत्याचार केले व माझी फसवणूक केली, अशी तक्रार राहाता पोलिसांत केली. पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत नवरदेव पंकजला ताब्यात घेतले.

अक्षतारूपी आशीर्वाद प्राप्त होण्यास काही मिनिटांचा अवधी असतानाच पंकजला राहाता पोलिसांनी ताब्यात घेतल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लग्नासाठी आलेल्या वधू-वरांकडील वऱ्हाडींमध्ये एकच गोंधळ उडाला. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून राहाता पोलिसांनी चालू मिरवणुकीतून नवरदेवाला थेट पोलिस ठाण्यात नेले. बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेवाला पोलिस ठाण्याची पायरी चढावी लागली. या प्रकरणी प्रथम राहाता पोलिस ठाण्यात महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार करणाऱ्या पंकज कदम याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. नंतर तो नाशिक रोड पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे.

==========

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

RCB Playoffs Scenario : चाहत्यांनो नाराज होऊ नका! RCB प्लेऑफमध्ये पोहोचणार, मुंबईनंतर गुजरातचाही खेळ जवळपास खल्लास

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

SCROLL FOR NEXT