Hiraman Khoskar & Dada Bhuse esakal
नाशिक

Nashik | सार्वजनिक जीवनात आमदारांचं हे वागणं बरं नव्हं : पालकमंत्री भुसे देणार खोसकरांना सल्ला

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपुरीत कार्यकर्त्यांच्या वाढदिवसाचा केक कोयत्याने कापल्याची चर्चा सध्या सुरू आहे. याबाबत मला माहिती नाही, त्याबाबत माहिती घेईन, त्यात तथ्य असल्यास आमदार खोसकर यांना सार्वजनिक जीवनात असे वागणे योग्य नाही, याचीपण खासगीत निश्चितच माहिती देईन, अशा शब्दांत पालकमंत्री दादा भुसे यांनी आमदार खोसकर यांना चिमटा काढला.

पालकमंत्री श्री. भुसे यांनी आज बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. भुसे म्हणाले, कोयत्याने केक कापण्याप्रकरणी मला माहिती नाही; पण कायदा सगळ्यांसाठी आहे. (Guardian Minister Bhuse will give advice to MLA Hiraman Khoskar Nashik News)

मतभेद नाहीत

आमदार सुहास कांदे नाराज असून, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ते दिसले नाहीत याविषयी भुसे म्हणाले, की आमच्यात मतभेद नाहीत. जिल्ह्याच्या प्रश्नावर १५ मुद्यांचा आराखडा करून त्यावर काम सुरू आहे. येत्या काळात हे प्रश्न सुटलेले दिसतील. आमच्या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नाचे ते फळ असेल.

राऊत यांचे समर्थक

खासदार संजय राऊत यांना जमीन मिळाल्यावर राज्यात सगळीकडेच फटाके फुटले, त्यामुळे एकट्या नांदगावला आनंदोत्सव झाला असे म्हणणे योग्य नाही. राऊत यांना मानणारे राज्यभर कार्यकर्ते आहेत. आदित्य ठाकरे हे राहुल गांधी यांच्या दौऱ्यात सहभागी होणार असल्याच्या प्रश्नांवर भुसे यांनी, ‘मी छोटा कार्यकर्ता असल्याने त्यावर भाष्य करणार नाही’, असे सांगत या विषयावर प्रतिक्रिया न देता मौन पाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : वडाळ्यातील विठ्ठल मंदिरात एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिषेक

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

SCROLL FOR NEXT