HSC Exam students Hall Ticket available from today esakal
नाशिक

HSC Exam Hall Ticket : बारावी परीक्षेचे हॉलतिकीट उद्या होणार उपलब्‍ध

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : फेब्रुवारी-मार्च महिन्‍यात होत असलेल्‍या इयत्ता बारावीच्‍या लेखी परीक्षेसाठी प्रवेशपत्र (हॉलतिकीट) शुक्रवारी (ता.२७) उपलब्‍ध होणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्‍य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सूचना जारी केलेल्‍या आहेत.

विद्यार्थ्यांना त्‍यांच्‍या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमार्फत हॉलतिकीट उपलब्‍ध करून दिले जाणार आहे. (HSC Exam hall ticket for 12th exam will available tomorrow nashik news)

इयत्ता बारावीच्‍या लेखी परीक्षांचे आयोजन फेब्रुवारी-मार्चमध्ये केले आहे. या परीक्षेला प्रविष्ट होण्यासाठी विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्‍ध करून देण्यात येत आहेत.

उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बारावीच्‍या परीक्षेची प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्‍या संकेतस्‍थळावर शुक्रवारी (ता.२७) सकाळी अकरापासून 'कॉलेज लॉगइन'मध्ये जाऊन डाऊनलोड करता येतील. या संदर्भात काही तांत्रिक अडचण उद्‌भवल्‍यास उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा : प्राप्तिकर उत्पन्न सवलत मर्यादा वाढणार?

अशा आहेत सूचना-

* शाळा-महाविद्यालयांनी ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायचे आहेत.

* प्रिटींगसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्‍क घेऊ नये.

* प्रिंट काढून त्‍यावर मुख्याध्यापक, प्राचार्यांचा शिक्‍का मारुन स्‍वाक्षरी करावी.

* प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असल्‍यास त्‍यांच्‍या दुरुस्‍त्‍या शाळा, महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्याव्‍या.

* प्रवेशपत्रातील फोटो, स्‍वाक्षरी, विद्यार्थ्याचे नाव या संदर्भातील दुरुस्‍त्‍या शाळा, महाविद्यालयांनी त्‍यांच्‍या स्‍तरावर करून त्‍यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवावी.

* विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्‍यास शाळा, महाविद्यालयांनी पुनःश्‍च प्रिंट काढून त्‍यावर लाल शाईने 'द्वितीय प्रत' असा शेरा लिहावा.

* फोटो सदोष असल्‍यास त्‍यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिकटवून संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शिक्‍का मारुन स्‍वाक्षरी करावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

खान सर यांच्या कोचिंग सेंटरबाहेर गोळीबार, ८ ते १० राउंड फायर; सुरक्षा रक्षक जखमी, कुणी केला हल्ला?

US Iran Conflict : शांतता करार होणार नाही? इराण-अमेरिका संघर्ष पुन्हा पेटला; क्षेपणास्त्र हल्ल्यांनी खळबळ

Farmer Loan Waiver: कर्जमाफीवर शिक्कामोर्तब! ५५ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा मिळणार लाभ; मात्र काय आहेत योजनेचे प्रमुख निकष-अटी

Satara Accident: उज्ज्वल भविष्याची स्वप्ने अधुरी! दुचाकी अपघातात शिरवळच्या दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू, कॉलेज प्रवेशाची माहिती घेऊन परतताना काळाचा घाला

आजचे राशिभविष्य - 03 जून 2026

SCROLL FOR NEXT