Arrested
Arrested  esakal
नाशिक

इगतपुरी खून, दंगलीचा सूत्रधार गजाआड; 26 दिवसांपासून होता फरार

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : इगतपुरी येथील हत्या (Murder)दंगल ( Riot) प्रकरणातील सूत्रधाराच्या मुसक्या आवळण्यात इगतपुरी पोलिसांना यश आले. हरिचंद्र काशीनाथ भंडारे (वय ४५, रा. नांदगाव सदो, ता. इगतपुरी) असे संशयिताचे नाव आहे. त्याला सोमवार (ता. २८)पर्यंत पाच दिवसांची इगतपुरी न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

इगतपुरीतील (Igatpuri) गायकवाडनगरमध्ये २८ जानेवारीला सकाळी दहा ते दुपारी तीनपर्यंत संशयित भंडारेसह त्याच्या ३० ते ४० साथीदारांनी तलवारी, गुप्ती व लाठ्याकाठ्या, फायटर घेऊन फ्रान्सिस ऊर्फ कवू पॅट्रिक मॅनवेल (वय २८) याच्या घरात घुसत ‘गावात राहायचे नाही’, असे म्हणत कवूला मारहाण करून गंभीर जखमी केले, तसेच राहुल रमेश साळवे (२३, रा. मिलिंदनगर, इगतपुरी) याच्यावर भंडारे याच्यासह पवन गुप्ता ऊर्फ सोनू (गवळीपाडा, शहाड, कल्याण), गणेश, मयूर माळी व भूषण माळी आदींच्या मदतीने साळवे याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर वार करून ठार मारले होते. तेव्हापासून सर्वच संशयित फरारी होते. इगतपुरी पोलिसांनी यातील सात जणांना अटक केली, तर दोन विधी संर्घषित बालकांना ताब्यात घेतले. मात्र, भंडारे २८ जानेवारीपासून फरारी होता. तब्बल २६ दिवसांनी त्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha Election Results Live : महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला मिळणार जास्त जागा ? थोड्याच वेळात सुरू होणार मतमोजणी

India Lok Sabha Election Results Live : प्रतीक्षा संपली! BJPने उघडले खातं... मोदी अन् राहुल गांधी यांच्या हृदयाचे वाढले ठोके

Varun Dhavan : वरुण धवन, नताशा बनले आई-वडील, झाली मुलगी

एलॉन मस्क जगातील सर्वांत श्रीमंत, मुकेश अंबानी १२ व्या स्थानावर; गाैतम अदानी १८ व्या स्थानावर

T20 World Cup 2024 : अफगाणिस्तानचे पारडे जड ; टी-२० विश्‍वकरंडकात पहिल्यांदाच सहभागी होत असलेल्या युगांडाचा कस लागणार

SCROLL FOR NEXT