Nashik Municipal Corporation
Nashik Municipal Corporation 
नाशिक

भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; महापौर, सभागृह नेते आमने-सामने

विक्रांत मते

नाशिक : महापालिका निवडणुका जवळ येत असताना महापालिकेतील सत्ताधारी भाजपमधील अंतर्गत वाद रोज नवीन रूप घेऊन समोर येत आहे. दोन दिवसांपासून अंदाजपत्रकाच्या ठरावा वरून वाद चव्हाट्यावर आले असताना गुरुवारी (ता.२८) प्रलंबित ठरावावरून महापौर व सभागृह नेते आमने- सामने आले. (Internal disputes are going on in the ruling BJP in Nashik Municipal Corporation)

मागील आठवड्यात प्रभाग समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत नाशिक रोडमध्ये आमदार बाळासाहेब सानप समर्थक नगरसेवकांनी दांडी मारल्यानंतर पक्षांतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले. त्यानंतर महिला व बाल कल्याण समितीमार्फत दिला जाणारा महिला स्वयंरोजगार प्रशिक्षणाच्या ठेक्यातील भाजपमधील अंतर्गत वाद समोर आले. आमदार समर्थक व पदाधिकाऱ्‍यांनी दोन स्वतंत्र ठेकेदार आणल्याने दोघांपैकी कोणाला ठेका द्यायचा यावरून वाद सध्या सुरू आहे. स्वयंरोजगार प्रशिक्षणाच्या ठेक्याचा वाद सुरू असतानाच महापौर सतीश कुलकर्णी यांनी चालू आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक प्रशासनाला सादर केले. त्यात भाजपच्या पंचवटी विभागातील नगरसेवकांच्या निधीला कात्री लावत तो निधी स्वतःच्या प्रभागांमध्ये वळविला. त्यानंतर प्रशासनाच्या पत्राचा आधार घेत स्थायी समितीच्या अंदाजपत्रकाची अंमलबजावणी होणार असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.

विविध प्रकारचे वाद सुरू असतानाच आज प्रलंबित प्रस्तावांचा वाद समोर आला. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रलंबित ठराव संमत करून विकासकामांचे उद्‌घाटन करावयाचे असल्याने त्या अनुषंगाने महापौर सतीश कुलकर्णी यांच्याकडे ठरावाची मागणी करण्यात आली. त्यातून सभागृहनेते कमलेश बोडके यांच्याकडे ठराव प्रलंबित असल्याचे स्पष्टीकरण महापौरांनी स्थायी समिती सभापती गणेश गिते यांना दिले. यासंदर्भात सभागृह नेते बोडके यांना विचारले असता, त्यांनी प्रभाग समिती अस्तित्वात नसल्याने महासभेच्या अधिकारात मंजूर करण्यात आलेले दहा ठराव असल्याचा खुलासा केला. तर, महापौर कुलकर्णी यांच्याकडे प्रभाग समित्यांच्या स्तरावरील २७ ठराव प्रलंबित असल्याचा दावा केला. या साऱ्या वादात सभापती गिते यांच्याकडून पडदा टाकण्याचा प्रयत्न झाला, मात्र पक्षांतर्गत खदखद सर्वांसमोर व्यक्त झाल्याने पक्षात ठीक चालले या प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोन आठवड्यांपूर्वी केलेला दावा फोल ठरला आहे.

(Internal disputes are going on in the ruling BJP in Nashik Municipal Corporation)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT