Ramayan
Ramayan esakal
नाशिक

सीतेचा इहलोक त्याग....

सोमनाथ कोकरे

नाशिक : अठरा वर्षापासून रामनवमीसाठी ज्येष्ठ चित्रकार आनंद सोनार रामायणातील एक प्रसंग ‘सकाळ’ च्या वाचकांसाठी रेखाटतात, या वर्षी त्यांनी सीतेचा इहलोक त्याग हा प्रसंग साकारला आहे. त्यांच्या खास भारतीय अलंकारिक शैलीत सुयोग्य मांडणी व आकर्षक रंगसंगती आणि चित्रकाराची कल्पना शक्ती यातून तयार झालेली ही कलाकृती. धरणी मातेने भूमिकन्या सीतेला आपल्या उदरात सामावून घेतानाचा हा प्रसंग.

श्रीराम, लक्ष्मण आणि सीता चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले. भरताकडून श्रीरामांचा राज्याभिषेक करण्यात आला. अयोध्येत रामराज्य सुरू झाले. राज्यात नीति-नियम पालन, वेद अध्ययन, क्षत्रिय, वैश्य व्यापार आपापल्या कार्यात अग्रेसर. विपुल गोधन, कृषी व्यवस्था, अन्न, वस्त्र, निवारा तसेच फळा-फुलांनी बहरलेले वृक्ष, खळखळणाऱ्या आणि स्वच्छ नद्या, गुंजन करणारे पक्षी, बागडणारे प्राणी, संगीत, काव्य, नृत्य नाट्य चित्र इत्यादी कला वादक नर्तक गायक यांना राजाश्रय व सर्वत्र सुबत्ता असलेले पृथ्वीतलावरचे आदर्श राज्य. मात्र श्रीराम अजूनही सीतेला वाल्मीकी आश्रमातसोडून दिल्याबद्दल मनातून खिन्न होते. म्हणून मुनी जणांच्या आदेशानुसार राजसूय यज्ञ करण्याचे आयोजन सुरू झाले. अनेक राजांना निमंत्रणे पाठवली. यज्ञासाठी यज्ञ मंडप व भव्य राजदरबार सजवला. पूजेसाठी पत्नी प्रत्यक्ष नाही म्हणून सीतेची सोन्याची प्रतिकृती तयार केली. यज्ञमंडपात मंत्रघोष करणारे मुनी, श्रीरामांच्या तीनही माता, हनुमान सर्व बंधू व त्यांच्या पत्नी आणि आनंदी प्रजाजन उपस्थित असतात. तेवढ्यात वाल्मीकी ऋषींच्या सोबत कृश प्रकृतीची सीता चिमुकल्या लव व कुश यांना घेऊन आली आहे. दरबारात राम सीतेची क्षणभर दृष्टी भेट होते. श्रीराम अजूनही आपल्यावर नाराज असल्याचं सीतेला जाणवतं, वाल्मीकी सीता परिपूर्ण शुद्ध असल्याचे पटवून देतात. त्याक्षणी सीता हात जोडून श्रीरामाला वंदन करते. धरणी मातेला स्पर्श करून मृदूकण कपाळी लावते. भरसभेत प्रार्थना करते, हे भूमाते, मी तुझे लेकरू मी शुद्ध आहे.

शुद्धतेची अग्निपरीक्षासह अनेकदा परीक्षा दिली आहे. आता तूच न्याय कर, मी जर खरे शुद्ध असेल तर मला त्वरित आपल्या उदरात घे माते, डोळे मिटून मनोभावे केलेली प्रार्थना ऐकून सभा स्तब्ध झालेली आहे. अचानक धरणी थरथरली आहे. जमीन दुभंगली प्रचंड आवाजासह जमिनीला मोठी भेग पडली. पृथ्वीच्या पोटातून मातेचे दोन सुंदर हात वर आले आणि कवेत लहान बाळाला उचलून घ्यावे तसेच सीतेला अलगद ओढून घेऊन भूमाता पुन्हा एकजीव झाली. अवाक राजदरबार सुन्न झाला. दरबारात केवळ उसासे, हुंदके आणि स्पंदने होती. बावरलेले लव कुश सैरभैर झाले. असा हा रामायणातील वेगळा प्रसंग श्री सोनार यांनी रेखाटला आहे. अत्यंत लयदर व सहज रेषा, जलरंगचा खुबीने वापर करून साधलेली विशेष रंगसंगती यातून वैशिष्ट्य पूर्ण कलाकृती सादर केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : "पंतप्रधान मोदी यांच्या हातात देश, सीमा आणि सैनिक सुरक्षित नाहीत," समाजवादी पक्षाचा हल्लाबोल

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT