नाशिक

Nashik Crime : सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पोलिसांच्या निषेधार्थ नातेवाइकांची निदर्शने

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : म्हसरूळ परिसरात शुक्रवारी (ता. २०) सकाळी विवाहितेने इमारतीच्या छतावरील पाण्याच्या टाकीच्या लोखंडी जिन्याला चादरीने गळफास घेत आत्महत्या केली.

विवाहितेने तिच्या सासरच्या मंडळींच्या जाचाला कंटाळूनच आत्महत्या केल्याने त्यांच्यावर कारवाईसह पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप करीत, तिच्या नातेवाइकांनी सुमारे तीन तास जिल्हा रुग्णालयात आंदोलन केले. (married woman commits suicide nashik crime news)

सविता सोमनाथ गरड असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घरातील कौटुंबिक वादातून महिलेने आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. काही वर्षांपासून तिचा सासरी छळ होत असल्याचा तिच्या नातेवाइकांचा आरोप आहे.

काही महिन्यांपासून मृत विवाहिता तिच्या माहेरीच राहत होती. पण, दोन-तीन दिवसांपूर्वी ती माहेरच्या नातेवाइकांबरोबर तिच्या सासरी गेली होती. तेव्हा पुन्हा तिच्या पतीत शाब्दिक वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने पती-पत्नी यांनी एकमेकांविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या झटापटीचा आणि हाणामारीचा व्हिडिओ असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

दरम्यान, सासरच्या मंडळींवर पोलिसांनी कारवाई केली नाही. त्यांच्यावर कारवाई केली असती तर तिचा जीव वाचला असता.

सासरच्या मंडळींविरोधात तक्रार नोंदविण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी मनस्ताप दिला, खूप विनंत्या केल्यावर तक्रार घेतली. त्यामुळे सासरच्या मंडळींबरोबर संबंधित पोलिसांवर कारवाई करावी, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आरोप करीत नातेवाइकांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात तीन तासांहून अधिक काळ धरणे आंदोलन केले.

लेकीचं काय चुकलं?

सासरच्या त्रासाला कंटाळून सविता गरड हिने आत्महत्या केल्याचा आरोप करीत तिच्या नातेवाइकांनी कारवाईची मागणी केली. माझ्या लेकीचं काय चुकलं? अस म्हणत तिच्या आईने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात हंबरडा फोडला. चौकशी करून संबंधित आरोपींवर योग्य ती कारवाई करू, असे म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजू पाचोलकर यांनी आश्वासन दिले. त्यानंतर सायंकाळी उशिरा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Driving Accident Kolhapur : जोरात वाहन चालवण्याची खुमखुमी, अल्पवयीन पोरानं थेट दुचाकीने आजोबांना उडवलं, मुलासह वडिलांवर गुन्हा

Indian Bank Jobs 2026 : बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! इंडियन बँकेत स्पेशलिस्ट ऑफिसरच्या ३५० पदांसाठी भरती सुरू; असा करा अर्ज

Latest Marathi News Live Update : कल्याणमधील कमलादेवी कॉलेजच्या विरोधात आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंदोलन

"लोकं अभिषेक शर्माला विसरतील...", वैभव सूर्यवंशीचे कौतुक करताना पाकिस्तानी खेळाडूचे वादाला तोंड फोडणारे विधान...

Ratnagiri drowning Incident : पावसजवळील गावखडी समुद्रात सांगलीचे तीनजण बुडाले, वडिलांनी दोघांना वाचवलं पण...; जिवापाड जपलेला मुलगाच गेला

SCROLL FOR NEXT